30 C
Mumbai
Saturday, May 11, 2024
Homeसंपादकीयबोफोर्स घोटाळ्यामुळे राजीव गांधींचे पंतप्रधान पद हुकले होते

बोफोर्स घोटाळ्यामुळे राजीव गांधींचे पंतप्रधान पद हुकले होते

धनश्री धुरी : टीम लय भारी

बोफोर्स तोफांच्या घोटाळ्यामुळे 1980 च्या दशकात भारताच्या राजकारणात भूकंप आला होता. बोफोर्समुळे 1989 मध्ये काँग्रेसला आपली सत्ता गमवावी लागली होती. त्यामुळे राजीव गांधींचे पुन्हा पंतप्रधान बन्याचे स्वप्न भंगले होते (Rajiv Gandhi dream of becoming Prime Minister again was shattered).

भारत सरकार आणि स्वीडनची मशिन्स बनवणारी कंपनी एबी बोफोर्स यांच्यात 24 मार्च 1986 साली 1,437 करोड रुपयांची डील झाली होती. ही डील भारतीय सैन्यासाठी 155 एमएमच्या 400 होवित्झर तोफच्या पुरवठ्यासाठी होती. परंतु 16 एप्रिल 1987 साली स्वीडिश रेडिओने आरोप केला की, एबी बोफोर्स कंपनीने या डीलमध्ये भारताच्या वरिष्ठ राजकीय नेत्यांना आणि सुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांना लाच दिली होती.

लोकांच्या आग्रहाखातर राजीव गांधी पंतप्रधान झाले, अन् देशाला प्रगतीपथावर नेले

राहुल गांधींनी इंधन दरवाढीविरोधात दिल्लीत काढली सायकल रॅली

यावेळी काँग्रेसचे सरकार होते आणि राजीव गांधी पंतप्रधान पदावर होते. लोकसभेत राजीव गांधींनी सांगितले होते की, या डीलमध्ये एबी बोफर्स कंपनीने कुठलीही लाच दिली नाही. तसेच या डीलमध्ये कुठल्याही दलालाचा हात नाही. परंतु विरोधकांनी मात्र राजीव गांधींवर ताशेरे ओढले (Opponents, however, slammed Rajiv Gandhi).

बोफोर्स घोटाळ्यात अमिताभ बच्चन यांचे ही नाव   

बोफोर्स घोटाळ्यात अमिताभ यांचा ही हात असल्याचा आरोप होऊ लागला होता. अमिताभ आणि राजीव गांधी यांची मैत्री असल्यामुळे बच्चन यांचा ही या घोटाळ्यात समावेश आहे असा आरोप करण्यात आला. अमिताभ यांनी हा आरोप खोटा आहे असे सांगितले आणि ब्रिटनच्या कोर्टात त्यांनी याचिका दाखल केली. ब्रिटनच्या कोर्टाने अमिताभ यांचा या घोटाळ्यात हात नाही असे सांगून त्यांना क्लिनचीट दिली.

Rajiv Gandhi becoming Prime Minister again shattered
राजीव गांधींसाठी अमिताभ यांनी इलाहाबाद मधून निवडणूक लढवली होती

अमिताभ आणि राजीव गांधी यांची घट्ट मैत्री होती. आपल्या मित्राला मदत करण्यासाठी 1984 मध्ये बच्चन इलाहाबाद इथून निवडणुकीत उतरले आणि त्यांनी यात विजयही मिळवला होता.

सोनीया गांधींनी म्युकरमायकोसिस बाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिले पत्र

Rajiv Gandhi 77th birth anniversary: Rahul Gandhi, PM Modi and other leaders pay tribute to former Prime Minister

विश्वनाथ प्रताप सिंग बनले पंतप्रधान

बोफोर्स घोटाळ्या वेळी वी. पी. सिंग भारताचे सुरक्षा मंत्री होते. या प्रकरणामुळे त्यांनी सुरक्षा मंत्री पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी राजीव गांधींनी बोफोर्स प्रकरणात भ्रष्ट्राचार केला आहे असा प्रचार करायला सुरुवात केली.

Rajiv Gandhi becoming Prime Minister again shattered
विश्वनाथ प्रताप सिंग

वी. पी. सिंग यांनी काही नेत्यांसोबत मिळून जनता दल पक्षाची निर्मिती केली. वी. पी. सिंग यांचा जनता दल पक्ष निवडणुकीत जिंकून आला आणि 1989 साली सिंग पंतप्रधान बनले होते.

कारगिल युद्धात बोफर्स तोफने केली होती उत्कृष्ट कामगिरी  

भारत विरुद्ध पाकिस्तानमध्ये 1999 मध्ये कारगिल येथे झालेल्या युद्धात भारताने विजय मिळवला होता. या युद्धात बोफोर्स तोफने उत्कृष्ट कामगिरी बजावली होती. त्यामुळे 26 जुलै हा दिवस कारगिल विजय दिवस म्हणून साजरा केला जातो.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी