35 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
Homeराजकीयगोपीचंद पडळकर यांच्या ‘य़ा’ घोषणेमुळे महादेव जानकरांविषयीची जागी झाली आठवण

गोपीचंद पडळकर यांच्या ‘य़ा’ घोषणेमुळे महादेव जानकरांविषयीची जागी झाली आठवण

टीम लय भारी

मुंबई : आमदार गोपीचंद पडळकर यांनी छकडा शर्यत भरविली, आणि महाराष्ट्रातील संपूर्ण राजकारण ढवळून निघाले. छकडा शर्यतीमुळे गोपीचंद पडळकर यांच्या लोकप्रियेतमध्ये बरीच वाढ झाली आहे(MLA Gopichand Padalkar ran the Chakda race, and the whole of Maharashtra was in turmoil).

छकडा शर्यत आंदोलनाच्या दुसऱ्या टप्प्याचीही घोषणा गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. महात्मा फुले यांच्या कटगुण ( ता. खटाव, जि. सातारा ) येथून छकड्याचे आंदोलन केले जाईल, असा इशारा पडळकर यांनी दिला आहे.

आमदार मकरंद पाटील यांनी स्थानिक आमदार निधीतुन रुग्नवाहीकेचे दिले दान

आयटीआय प्रशिक्षणार्थ्यांसाठी पंचतारांकित संधी

MLA Gopichand Padalkar
गोपीचंद पडळकर हे सुद्धा जानकर यांचेच शिष्य

पडळकर यांच्या या इशाऱ्यामुळे अनेकांच्या मनात महादेव जानकर यांची आठवण जागी झाली. कारण महात्मा फुले यांच्या ‘कटगुण’ या गावासोबत महादेव जानकर यांचे नाते जोडलेले आहे.

महात्मा फुले यांची जयंती वा पुण्यतिथी कटगुण येथे सुरू करण्याचा पायंडा जानकर यांनी पाडला. तोपर्यंत अगदी छगन भुजबळ यांचेही कटगुणकडे कधी लक्ष नव्हते.

बहुजन विचारांची चळवळ जानकर यांनी कटगुण येथूनच सुरू केली. फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारधारेवर जानकर यांनी ‘राष्ट्रीय समाज पक्षा’ची स्थापना केली.

गोपीचंद पडळकर हे सुद्धा जानकर यांचेच शिष्य. जानकरांच्या पक्षातूनच त्यांनी राजकीय वाटचाल सुरू केली होती. पण कालांतराने जानकर व पडळकर यांच्यात खटके उडू लागले. त्यामुळे पडळकर जानकरांपासून दूर झाले.

चंद्रकांत पाटील यांचा जावईशोध, म्हणे ‘जम्मू – काश्मिर’ मध्ये ‘आदर्श लोकशाही’

Watch video: BJP MLC Gopichand Padalkar, supporters booked by Sangli cops for organising bullock cart race

पडळकर जरी जानकरांपासून दूर झाले, तरी त्यांनी बहुजन विचारांची कास सोडली नाही. भाजपमध्ये गेल्यानंतर त्यांच्यावर हिंदुत्ववादाचा आरोप केला जातो. विशेषत: संभाजी भिडे यांचा पडळकरांवर शिक्का आहे.

वास्तवात मात्र पडळकर यांचा मूळ पिंड बहुजन विचारसरणीचा आहे. आपल्या छकडा शर्यत आंदोलनाचा पुढचा टप्पा जाहीर करताना त्यांनी कटगुणचा उल्लेख केला. त्यामुळे पडळकरांचा बहुजन विचार, आणि महादेव जानकर यांच्याशी त्यांच्या असलेल्या जुन्या नात्याला पुन्हा एकदा उजळणी मिळाली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी