29 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Homeमुंबईआडमुठ्या बिल्डरला २१ लाखाचा दंड, महापालिकेची कारवाई !

आडमुठ्या बिल्डरला २१ लाखाचा दंड, महापालिकेची कारवाई !

मुंबई महानगर पालिकेची (BMC) परवानगी न घेता अनधिकृतपणे इमारतीसाठी रस्ता खोदून जलजोडणी (unauthorized water connection) घेणाऱ्या रेनिसन्स कन्स्ट्रक्शन कंपनीच्या बिल्डरला महापालिकेने साधारण सहा-सात वर्षांपूर्वी ७ लाखांचा दंड ठोठावला होता. मात्र बिल्डरने दंड भरण्यास टाळाटाळ केल्यामुळे गेल्या दोन महिन्यांपूर्वी पालिकेने संबंधीत बिल्डरला २१ लाखांचा दंड (Builder fined) भरण्यास सांगितले होते, मात्र दोन महिने उलटून देखील बिल्डरने अद्याप दंड न भरल्यामुळे अखेर पालिकेने बिल्डरला सात दिवसांत दंड न भरल्यास त्याच इमारती शेजारी सुरू असलेल्या एका इमारतीच्या पनर्विकासाच्या कामासाठी पालिका कोणत्याही सुविधा पुरविणार नाही असा इशारा दिला आहे.

मुंबई महानगर पालिकेची परवानगी न घेता दादर (प.) येथील प्लाझा सिनेमा मागील भूखंड १३ टीपीएस -३ येथील बायापार्क या इमारतीसाठी रस्ता रस्ता खोदून जल जोडणी केल्याप्रकरणी रेनिसन्स कन्स्ट्रक्शन कंपनीच्या बिल्डरला सन २०१५ मध्ये महापालिकेने ७ लाख १२ हजार ८०० रुपये दंड ठोठावला होता. मात्र बिल्डरने दंड न भरल्याने या अनधिकृत जलजोडणी आणि रस्ता खणून चर काढल्याप्रकरणी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) यांना याबाबतचा अहवाल सादर केला होता. त्यानंतर संबंधित बिल्डरला २१ लाख ३८ हजार ४०० रुपये दंड भरण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) यांनी दिले होते.

Builder fined 21 lakhs in case of unauthorized water connection
Builder fined 21 lakhs in case of unauthorized water connection

याबाबत पालिकेच्या जी उत्तर विभागाच्या सहाय्यक अभियंता (परिक्षण) यांनी २८ ऑगस्ट २०२२ आणि११ ऑक्टोबर २०२२ रोजी पत्र पाठवून २१ लाख ३८ हजार ४०० रुपये दंड भरण्याचे आदेश दिले होते. मात्र तरी देखील संबंधित बिल्डरने अद्यापपर्यंत दंड भरलेला नाही. अखेर महापालिका जी उत्तर विभागाच्या सहाय्यक आयुक्तांनी गुरूवारी (५ जानेवारी) रोजी पत्र पाठवून पुढील सात दिवसांत दंड न भरल्यास या इमारती शेजारीच सुरू असलेल्या दुसऱ्या इमारतीच्या पुनर्विकासाच्या बांधकामासाठी कोणतीही सुविधा देण्यात येणार नाही असा इशारा दिला आहे.

हे सुद्धा वाचा

संजय राऊत म्हणाले; औरंगजेबजी, कसाबजी, शाहिस्तेखानजी, अब्दुल गुरूजी…
ब्रँडेड कंपनीची बनावट पायताणे; पोलिसांची दुकानदारांवर कारवाई

रिषभ पंतच्या नावाने गिरगाव चौपाटीवर फलक

तसेच जी उत्तर विभागाच्या सहाय्यक आयुक्तांनी झोपडपट्टी पूनर्विकास प्राधिकणाच्या कार्यकारी अभियंता-३ यांना देखील पत्र पाठविले आहे. या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, या पत्राव्दारे झोपडपट्टी पूनर्विकास प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना कळविले आहे की, दादर (प.) येथील बायापार्क या इमारतीसाठी रेनिसन्स कन्स्ट्रक्शन या बिल्डरने पालिकेची परवानगी न घेता रस्ता खोदून इमारतीसाठी जल जोडणी घेतली होती. याप्रकरणी पालिकेने २१ लाख ३८ हजार ४०० रुपयांचा दंड ठोठावला आहे. मात्र अद्याप बिल्डरने दंड भरलेला नाही. या बिल्डरचा बायापार्क इमारती शेजारी झोपडपट्टी पूनर्विकास प्राधिकरणअंतर्गत दूसरे पूनर्विकासाचे काम सुरू आहे. मात्र सदर बिल्डरने पालिकेकडे दंडाची रक्कम भरल्याशिवाय तसेच पालिकेकडून याबाबत खात्री करून घेतल्याशिवाय संबंधीत बिल्डरला प्राधिकरणाकडून कोणत्याही प्रकारची परवानगी अथवा ना-हरकत देऊ नये, असे या पत्रात म्हटले आहे.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी