28 C
Mumbai
Saturday, July 27, 2024
Homeराजकीयछत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज नसते तर महाराष्ट्रात हिंदूच उरले नसते :...

छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज नसते तर महाराष्ट्रात हिंदूच उरले नसते : देवेंद्र फडणवीस

छत्रपती संभाजी महाराजांना स्वराज्यरक्षक म्हणायला कुणाची ना नाही, ते स्वराज्यरक्षक आहेतच पण ते धर्मवीर नाहीत असे म्हणणे हा एकप्रकारे संभाजी महाराजांच्या विचारांशी द्रोह आहे. संभाजी महाराजांवर हा एकप्रकारे अन्यायच आहे, कारण कशा करिता संभाजी महाराजांना इतके अनन्वित अत्याचार सहन करावे लागले? काय म्हणत होता औरंगजेब त्या ठिकाणी? असा सवाल करतानाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले खऱ्या अर्थाने देव, देश आणि धर्माकरिता छत्रपती संभाजी महाराज लढले. छत्रपती शिवाजी महाराज (Shivaji Maharaj), छत्रपती संभाजी  (Sambhaji Maharaj) महाराज नसते तर या महाराष्ट्रात (Maharashtra) हिंदूच (Hindu) उरले नसते. त्यामुळे ते धर्मवीर आहेतच, त्यांना धर्मवीर नाही असे म्हणणे हा द्रोह आहे. असे (Devendra Fadnavis)देवेंद्र फडणवीस म्हणाले.

यावेळी पत्रकारांनी फडणवीस यांना विचारले की, छगन भुजबळ आम्ही शरद पवार यांना जाणता राजा म्हणणार असे म्हणाले, याबाबत विचारले असता फडणवीस म्हणाले, या देशात जाणतेराजे एकच छत्रपती शिवाजी महाराज, बाकी कुणाला आपल्या नेत्याला काय म्हणायचे ते त्यांनी म्हणावे, जनता नाही म्हणणार असे देखील फडणवीस यावेळी म्हणाले.

सुप्रिया सुळे यांनी काल राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना वैयक्तिक आरोपांवर उतरु नये असे आवाहन केले होते, यावर फड़णवीसांना विचारले असता ते म्हणाले, सुप्रियाताईंनी जे म्हटले त्याचे मी स्वागतच करतो. फक्त सुप्रियाताईंनी म्हटलेले त्यांच्या कार्यकर्त्यांनी ऐकले पाहिजे. याचे कारण सातत्याने अशा पद्धतीची खालच्या दर्जाची टीका ही राष्ट्रवादीचे कार्यकर्तेच सोशल मीडियात करत असतात. त्यामुळे मी सुप्रियाताईंचे पूर्ण समर्थन करतो, आम्ही देखील तेच आवाहन करु, पण सुप्रियाताईंच्या म्हणजेच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सुप्रियाताईंचे एकदातरी ऐकावे अशी आमची अपेक्षा आहे, असे देखील फडणवीस यावेळी म्हणाले.

हे सुद्धा वाचा

संजय राऊत म्हणाले; औरंगजेबजी, कसाबजी, शाहिस्तेखानजी, अब्दुल गुरूजी…

अजित पवार भूमिकेवर ठामच; स्वराज्यरक्षक ही उपाधी व्यापक आणि सर्वसमावेशक

शरद पवार म्हणाले, माझ्यासमोर संभाजी महाराजांबद्दल दोन पद्धतींचे लिखाण

दरम्यान बुधवारी (दि.४) रोजी अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली. यावेळी ते म्हणाले, छत्रपती संभाजी महाराजांना स्वराज्यरक्षक म्हणायचे की धर्मवीर म्हणायचे याबद्दल माझी भूमिका ही स्वराज्यरक्षकच म्हणावे अशी आहे. परंतू पवारसाहेबांनी जे म्हटले तसे कुणी धर्मवीर म्हणत असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे. स्वराज्यरक्षक ही उपाधी अधिक व्यापक आणि सर्वसमावेशक आहे असे मला वाटते, असे अजित पवार म्हणाले होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी