25 C
Mumbai
Thursday, November 30, 2023
घरराजकीय'महाराष्ट्राचे मंत्रालय गुजरातमध्ये हलवणार'

‘महाराष्ट्राचे मंत्रालय गुजरातमध्ये हलवणार’

राज्याच्या सत्ता संघर्षाचा विचार केला तर भाजपचे फोडाफोडीचे राजकारण फार काही नवीन नाही. त्याचप्रमाणे सत्ताधारी आणि विरोधकांच्या आरोपप्रत्यारोपांच्या फैरी फार नवीन नाहीत. जसजसा निवडणुकीचा कालावधी येतो त्याच पद्धतीने राज्यातील देशातील पक्ष टीकेचे बॉम्ब फोडताना दिसत आहेत. शिवसेनेत दोन गट झाल्यापासून शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गट यांच्यात पेटलेली वादाची ठिणगी शमण्याचे नाव घेत नाही. दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाचे युवा नेते आदित्य ठाकरे मुंबईतील डिलाईल रोड ब्रिजच्या कामाची पाहणी करायला गेले होते. अनेक दिवसांपासून डिलाईल रोडचे काम ठप्प आहे. यावरुन आता आदित्य ठाकरेंनी सरकारवर निशाणा साधला आहे.

अनेक दिवसांपासून मुंबईतील डिलाईल रोड ब्रिजचे काम अजूनही अर्धवट आहे. गेली अनेक दिवसांपासून या ब्रिजचे काम सुरू असून यासाठी दिरंगाई होताना दिसते. तर गोखले पुल पाडून सरकारने राजकीय स्टंट केला का? असा प्रतीसवाल आता आदित्य ठाकरेंनी केला आहे. डिलाईल रोड ब्रिजच्या अर्धवट कामामुळे आता आदित्य ठाकरेंनी डिलाईल रोड ब्रिजचे नाव आम्ही डिले ब्रिज असे ठेवणार आहे. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या साईट्सवर कधीच येत नाहीत. ते फक्त दिल्लीत पळत असतात. या सरकारला मुंबईची, महाराष्ट्राची काळजी नसून त्यांना दिल्ली आणि गुजरातची काळजी दिसते, अशी सडकून टीका सत्ताधाऱ्यांवर केली आहे.

हे ही वाचा

आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या हिवाळी सत्राच्या परीक्षा उद्यापासून

आरोपी अविनाश भोसले तुरुंगात की राजेशाही रुग्णालयात?

शिर्डीच्या सभेत नाव न घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विरोधकांवर कडाडले

सरकारला गुजरातची जास्त काळजी

गणपती आगमनादिवशी पुलाची पाहणी केली. १० नोव्हेंबरपर्यंत दुसरी बाजू सुद्धा पूर्ण होऊन वाहतुक सुरू केली जाईल अशी अपेक्षा आहे. गोखले पुलाचे काम वेळेत पूर्ण होऊ शकत नाही. रेल्वे विभागाकडून सहकार्य मिळत नसल्याची माहिती आदित्य ठाकरेंनी दिली आहे. तर त्यांनी काही महिन्यांपूर्वी राज्यातील कंपन्या, हिरे उद्योग गुजरातला पाठवल्या. हे सरकार तोडून मोडून बनवले गेले आहे. आम्हाला वाटलं हे सरकार महाराष्ट्रासाठी काही तरी करेल. मात्र या सरकारला आमच्यापेक्षा जास्त काळजी गुजरातची आहे. वेदांता फॉक्सकॉन बल्कड्रग पार्क, अगदी वर्ल्डकपची फायनल सुद्धा त्यांनी गुजरातला नेली. अशी टीका करत उद्धव ठाकरेंनी सत्ताधारी सरकारचे कान टोचले आहेत. त्यानंतर त्यांनी सिनेट निवडणुकीवर भाष्य केले.

सिनेट निवडणुकीवर भाष्य

आदित्य ठाकरेंनी आमच्या ताकदीला हे सरकार घाबरत आहे. मागे पदवीधर निवडणुका झाल्या त्यामध्ये महाविकास आघाडी विजयी झाली. या युनिटच्या दहा जागांवर सुद्धा आम्ही जिंकणार होतो हे त्यांना माहीत होते आणि त्यामुळे या निवडणुका पुढे नेल्या जात आहेत. यानंतर त्यांनी मुख्यमंत्री आणि सत्ताधारी सरकारवर टीप्पणी केली आहे.

घटनाबाह्य मुख्यमंत्री

शिवसेना पक्षाची घटना ही दिवंगत नेते आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी लिहली होती. मात्र पक्षात दोन गट करून एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेवून सत्ता स्थापन केली. मुख्यमंत्री हे घटनेत न बसणारे आहेत. घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांवर आपण किती विश्वास ठेवायचा? आमच्यापासून ज्यांनी ज्यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला त्या सगळ्यांचा त्यांनी विश्वासघात केलाय, असे वक्तव्य करत आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांवर ताशेरे ओढले आहेत.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी