33 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
Homeराजकीयआरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या हिवाळी सत्राच्या परीक्षा उद्यापासून

आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या हिवाळी सत्राच्या परीक्षा उद्यापासून

राज्यातील वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या परीक्षांबाबत अनेक दिवसांपासून विद्यार्थी वाट पाहत आहेत. आरोग्य विज्ञान विद्यापिठाच्या हिवाळी सत्र २०२३ च्या परीक्षेबाबत कोणतीही माहीती समोर आली नव्हती. या बाबतची माहिती अधिकृतरीत्या काही दिवस समोर न आल्याने वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थांना अभ्यासाचे नियोजन करता येत नव्हते. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिकचे विद्यापीठाच्या कुलगुरूंनी याबाबत कोणतीही माहिती दिली नव्हती. मात्र आता आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या हिवाळी सत्र-२०२३ अभ्यासक्रमाच्या परीक्षांबाबतची माहिती परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू यांनी दिली आहे.

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या हिवाळी सत्र २०२३ अभ्यासक्रमाच्या परीक्षांना उद्यापासून (२८ ऑक्टोबर) सुरूवात होत आहे. वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष-२०१९, पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाचे एम.डी., एम.एस., एएस्सी मेडिकल (बायोकेमिस्टी आणि मायक्रोबायोलॉजी), मास्टर इन पब्लिक हेल्थ, एम.फिल., या अभ्यासक्रमांची लेखी परीक्षा ऑफलाईन पध्दतीने होणार आहे. राज्यातील ५० परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात येणार असून ९०२४ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत, अशी माहिती परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू यांनी दिली.

हे ही वाचा

आरोपी अविनाश भोसले तुरुंगात की राजेशाही रुग्णालयात?

शिर्डीच्या सभेत नाव न घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विरोधकांवर कडाडले

गुणरत्ने सदावर्तेंचा मराठा आरक्षणावर काय बोलले होते? काँग्रेसच्या निशाण्यावर सदावर्ते

परीक्षेच्या अनुषंगाने कनिष्ठ पर्यवेक्षक, परीक्षक, अंतर्गत दक्षता पथक, वरिष्ठ पर्यवेक्षक, केंद्रप्रमुख, केंद्र निरिक्षक, भरारी पथक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सर्व परीक्षा केंद्रावरील परीक्षा खोल्यांमध्ये सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र (हॉल तिकीट) वितरीत करण्यात आली आहेत.

परीक्षेविषयी अधिक माहिती

विद्यापीठाच्या हिवाळी सत्रातील सर्व परीक्षा ऑफलाईन पध्दतीने वेळापत्रकानुसार होणार आहेत. परीक्षेविषयी अधिक माहिती विद्यापीठाचे अधिकृत संकेतस्थळ www.muhs.ac.in वर माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी