30 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
Homeमुंबईराज्यपालांची सुचना, वि. दा. सावरकर यांचे नाव मुंबई विद्यापीठाच्या वसतिगृहाला द्या

राज्यपालांची सुचना, वि. दा. सावरकर यांचे नाव मुंबई विद्यापीठाच्या वसतिगृहाला द्या

टीम लय भारी

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या चार शैक्षणिक इमारतींचे आज (दि. 08 जुलै) राज्यपालांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. विद्यापीठात परीक्षा व प्रशासकीय भवन, ज्ञान स्रोत केंद्र (ग्रंथालय इमारत) मुलींचे वसतिगृह आणि आंतरराष्ट्रीय विद्यार्थी वसतिगृह अशा या चार नवीन इमारतींचा आता समावेश करण्यात आला आहे.

याप्रसंगी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर, प्रा. रवींद्र कुलकर्णी, प्रभारी कुलसचिव डॉ. विनोद पाटील उपस्थित होते, तर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची उद्घाटन प्रसंगी प्रमुख उपस्थिती दर्शवली होती.

उद्घाटन प्रसंगी बोलताना राज्यपाल कोश्यारी म्हणाले, जागतिक पातळीवरील शैक्षणिक गुणवत्तेचा अभ्यास करून शैक्षणिक उंची गाठण्यासाठी वाटचाल करण्याचा दृढ निश्चय मुंबई विद्यापीठाने केला पाहिजे.जागतिक पातळीवर होणारे शैक्षणिक बदल यावर संशोधन करून भारताने वाटचाल करावी.भारतामध्ये शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच येथील संस्कृतीचे वेगळेपण आहे, असे मत त्यांनी यावेळी मांडले.

राज्यपालांची सुचना, वि. दा. सावरकर यांचे नाव मुंबई विद्यापीठाच्या वसतिगृहाला द्या

राज्यपाल कोश्यारी पुढे म्हणाले, विद्यापीठामध्ये कार्य करताना अडचणी आणि तक्रारी याकडे लक्ष न देता विद्यापीठासाठी आपण काय करतोय आणि विद्यापीठ आपल्याला काय देतंय याचा आपण विचार करून कार्य केले तर यश नक्कीच मिळेल, असेही राज्यपालांनी सांगितले.

मुंबई विद्यापीठामध्ये अनेक नामवंत विद्यार्थी तयार झाले आहेत, असे अनेक नामवंत विद्यार्थी नोबेल पुरस्कारापर्यत पोहोचले पाहिजे त्यांचा सन्मान झाला पाहिजे यासाठी सर्वांनी कार्य करावे, असे सांगून कोश्यारी यांनी विद्यार्थांना प्रोत्साहित केले.

दरम्यान, विद्यापीठाचे कुलगुरू सुहास पेडणेकर म्हणाले, विद्यापीठासाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. भविष्यातील डिजिटल ग्रंथालयाचा अभ्यास करून अद्ययावत अशी ग्रंथालयाची इमारत उभारण्यात आली आहे. तसेच वसतीगृहात राहणाऱ्या मुलांना चांगल्या सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेत यासाठीही नवीन वसतीगृह इमारत बांधण्यात आली आहेत, असे

मुंबई विद्यापीठाची व्याप्ती मोठी असून सात जिल्ह्यांमध्ये व्यापलेले विद्यापीठ आहे. मागील दोन वर्षांमध्ये कोविडमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी प्रयत्न आणि दुसऱ्या बाजूला परीक्षा वेळेत घेणे, निकाल वेळेत जाहीर करणे हे एक मोठे आव्हान विद्यापीठांसमोर होते. या काळात प्राध्यापक, कर्मचारी वर्ग यांनी सहकार्य केले म्हणून हे शक्य झाले. जागतिक पातळीवरील शैक्षणिक बदल आणि काळाची गरज लक्षात घेऊन विद्यापीठांमध्ये शैक्षणिक वाटचाल केली पाहिजे असेही श्री. पेडणेकर यांनी यावेळी सांगितले.

हे सुद्धा वाचा…

VIDEO : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा अडचणीत?

उद्धव ठाकरे यांचा गंभीर आरोप! ‘जे’ गेले ते घातपात करून गेले…

आता समृध्दी महामार्ग आणखी सुसाट होणार

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी