26 C
Mumbai
Sunday, April 14, 2024
Homeमुंबईयंदा कंदिलांवर राजकीय नेत्यांचीच चलती!

यंदा कंदिलांवर राजकीय नेत्यांचीच चलती!

राज्यात गेल्या सव्वा वर्षात बऱ्याच राजकीय हालचाली झाल्या आहेत. आधी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे 40 आमदार घेऊन पक्षात उभी फूट पडली. त्यानंतर जुलैमध्ये माजी विरोधी पक्षनेते अजित पवार हे आठ आमदारांना घेऊन सत्तेत सहभागी झाले. त्यानंतर राज्याच्या राजकारणात कोण  आपला आणि कोण परका हे काही समजायला मार्ग नाही. असे असताना यंदाच्या दिवाळी सणातील कंदिलांवर भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार गट) यांच्या नेत्यांचीच छबी पहायला मिळत आहे. येत्या काळात राज्यात महापालिकांच्या निवडणुका लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा परिस्थितीत कार्यकर्ते, पदाधिकारी आपल्या नेत्यांना खुश करण्यासाठी ही शक्कल लढवत असल्याचे पहायला मिळत आहे. काही का असेना यंदाच्या दिवाळी कंदिलांवर दादा, भाई यांचेच फोटो पहायला मिळणार आहेत.

दिवाळीच्या अनेक आकर्षणापैकी एक प्रमुख आकर्षण असतं आकाश कंदिलाचे. दिवाळीत कंदील लोकांना आकर्षित करत असतो. आपल्या दारी लावलेला आकाश कंदील सर्वांपेक्षा वेगळा आणि आकर्षक असावा, अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. बाजारात चिनी कंदिल दाखल झालेले असताना कागदाचे, कापडाचे मोठमोठे आकाश कंदिल बनवण्याच्या ऑर्डर खूप आधीपासून एका समाजाला पारंपरिक पद्धतीने मिळालेले आहे.

त्यानुसार हे आकाश कंदिल तयार झाले आहेत. दिवाळीची साफसफाई, खमंग फराळ आणि दिवाळीनिमित्त आरास यांसारख्या गोष्टींसाठी लगबग सुरू आहे. अनेकजण घरीच आकाश कंदील बनवतात, तर काहीजण अख्खं मार्केट पालथं घालतात आणि आकर्षक, वेगळा आकाश कंदील शोधून काढतात.

यंदाच्या वर्षी सगळेच राजकीय पक्ष आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचा सर्व इच्छुक उमेदवारांचा कंदिलाकडे भर आहे. मुंबईतील मोठाल्या चौकांत लावण्यासाठी भले मोठे पॉलिटिकल प्रचाराच्या कंदीलांना मागणी वाढली आहे. घाटकोपरच्या असल्फा विभागात नितीन खोपकर हे गेले वीस वर्ष आकाश कंदील बनविण्याचा व्यवसाय करतात.

दोन वर्षात अशा राजकीय प्रचारांचे कंदीलला मागणी प्रचंड वाढली आहे. राजकीय पक्षांचा प्रचार दिवाळीत विविध पद्धतींनी सुरू असतोच, त्यातील एक उदाहरण म्हणजे, चौकाचौकात लावले जाणारे मोठाले आकाश कंदील.

हे सुद्धा वाचा 

पाकिस्तानच्या खेळाडूंचा वसिम आक्रमवर विश्वास नाही
वादाचा फटाका पेटवण्यापेक्षा सलोख्याचा फराळ करा-आमदार कपिल पाटलांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
आदित्य ठाकरेंच्या ट्विटचा सरकारने घेतला धसका !
आकाश कंदील लोक जाता येता पाहतात आणि अगदी सहज पक्षाचा प्रचार होतो. त्यामुळेच असे आकाश कंदील खरेदी करीत असल्याचं राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. राजकीय मंडळींच्या कंदिलाच्या झगमगाटात दिवाळी तर उजळून निघेलच, पण राजकीय पक्षांचा, उमेदवारांचा प्रचारही जोरदार होत आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी