32 C
Mumbai
Wednesday, May 1, 2024
Homeमुंबई'जब तक मै जिंदा हुं, आप के घर को आँच नही आने...

‘जब तक मै जिंदा हुं, आप के घर को आँच नही आने दूंगा’ जितेंद्र आव्हाडांचा रेल्वे लगतच्या झोपडपट्टीवासियांना दिलासा

टीम लय भारी

 

ठाणे : गेल्या काही दिवसापासून मुंब्रा येथील शाहू नगर परिसरातील रेल्वे रुळाच्या बाजूला असणाऱ्या झोपडपट्ट्यांमधील रहिवाश्यांना रेल्वे विभागाकडून संपूर्ण जागा खाली करण्याकरीता नोटीसा पाठवल्या होत्या. या नोटीसमध्ये नमूद केल्याप्रमाणे रेल्वे पटरी शेजारील रहिवाशी आज ११ मार्चला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमधील रेल्वे प्रबंधक कार्यालय म्हणजेच DRM येथे हजर राहिले होते. यावेळी राज्याचे गृहनिर्माणमंत्री डॉं. जितेंद्र आव्हाड उपस्थित होते. त्यांनी या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रबंधक शलभ गोयल यांची भेट घेतली.

यावेळी, रेल्वे रुळाशेजारी राहणाऱ्या रहिवाश्यांच्या कागदपत्रांनुसार, येथे राहणारे रहिवाशी हे ३० ते ३५ वर्षापासून राहत आहेत असे, आव्हाड यांनी सांगितले. याशिवाय, या रेल्वे रुळाशेजारी राहणाऱ्या रहिवाश्यांची जागा ही रेल्वे प्रशासनाची नसून, महाराष्ट्र सरकारची जागा असल्याचे जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.येथे आलेल्या रहिवाश्यांना देखील ‘जब तक मै जिंदा हुं, आप के घर को आँच नही आने दूंगा’ असे, आश्वासन जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. त्यांच्या आश्वासनामुळे मुंब्रा झोपडपट्टीवासियांना दिलासा मिळाला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी