29 C
Mumbai
Sunday, May 5, 2024
HomeमुंबईMNS : मनसेच्या दणक्याने ‘मराठी’ लेखिकेचे आंदोलन यशस्वी, पोलिसही आले अन् मुजोर...

MNS : मनसेच्या दणक्याने ‘मराठी’ लेखिकेचे आंदोलन यशस्वी, पोलिसही आले अन् मुजोर सराफाने माफीही मागितली

टीम लय भारी

मुंबई : मनसेने (MNS) चोप दिल्यानंतर आणि माफी मागत नाही तोवर दुकान उघडू देणार नाही, असा इशारा दिल्यानंतर कुलाबा येथील महावीर ज्वेलर्सच्या मालकाने मराठी लेखिका शोभा देशपांडे यांची माफी मागितली. त्या काल दुपारपासून या दुकानाबाहेर ठिय्या आंदोलन करत होत्या. या प्रकरणात आज मनसेने खळ्ळं खट्याक केल्यानंतर मुजोर सराफाने अखेर लेखिका शोभा देशपांडे यांची माफी मागितली.

मराठीचा आग्रह धरल्याने सराफाने अपमानास्पद वागणूक दिल्याने मुंबईतील कुलाब्यात लेखिका शोभा देशपांडे यांनी जवळपास २० तास ठिय्या दिला. अखेर या मुजोर सराफाने शोभा देशपांडे यांची शुक्रवारी माफी मागितली. ‘मला मराठी बोलता येतं, माझा जन्म मुंबईत झाला आहे, मला माफ करा’, असं सांगत महावीर ज्वेलर्सचा मालक शंकरलाल जैन याने शोभा देशपांडे यांची माफी मागितली.

गुरुवारपासून ठिय्या सुरु केलेल्या शोभा देशपांडे रात्रभर फूटपाथवरच होत्या. सकाळी मनसेचे नेते संदीप देशपांडे या ठिकाणी पोहोचून त्यांची विचारपूस केली. मनसे कार्यकर्त्यांनी कुलाबा गाठल्यानंतर पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेत शोभा देशपाडे यांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. तसेच, सराफ दुकानाच्या मालकास बोलावून माफी मागण्यास भाग पाडले. मराठीजनांचा आग्रहापुढे अखेर गुजराती सराफ दुकानदाराने मराठीतून माफी मागत आपली चूक कबूल केली.

सकाळी साडेदहाच्या सुमारास पोलीस एका गाडीतून ज्वेलरला घेऊन घटनासाठीस्थळी आले. यानंतर इथे एकच गोंधळ आला. आधीच उपस्थित असलेले मनसे सैनिक अतिशय आक्रमक झाले. ‘मला मराठी बोलता येतं, माझा जन्म मुंबईत झाला आहे. मला माफ करा, असं हा सराफा व्यावसायिक म्हणाला. मात्र शोभा देशपांडे यांचे पाय धरुन माफी मागा’, असा आग्रह मनसे कार्यकर्त्यांनी केला. माफी मागितल्यानंतर पोलीस महावीर ज्वेलर्सच्या मालकाला घेऊन जात असताना, मनसे कार्यकर्त्यांनी त्याला चांगलाच प्रसाद दिला.

मालकाने माफी मागितली तरी शोभा देशपांडे त्याच्या दुकानाच्या परवान्यासाठी आग्रही होत्या. मालकाने परवाना दाखवावा या मागणीवर त्या ठाम आहेत. यानंतर पोलीस शोभा देशपांडे यांना वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन गेले. शोभा देशपांडे यांचं वय आणि कालपासून उपाशी असल्याने पोलीस शोभा देशपांडे यांना रुग्णालयात घेऊन गेले.

महाराष्ट्रात विशेषत: मुंबईतच अनेकदा माय मराठीचा अवमान झाल्याच्या घटना उघडकीस येतात. काही अमराठी भाषिकांकडून मराठी भाषेचा वापर करण्यास नकार देत मराठी माणसांना, मराठीजनांना डिवचण्याचं काम होतंय. पुन्हा एकदा अशीच घटना मुंबईतील कुलाबा परिसरात उघडकीस आली.

शोभा देशपांडे या लेखिका असून ‘थरारक सत्य इतिहास’ आणि ‘इंग्रजी इंडिया हाच आपला खरा शत्रू’ या दोन पुस्तकांचे संकलन त्यांनी केलंय. शोभाताई मराठी प्रेमी असून त्या मराठीचा नेहमीच आग्रह करत असतात, त्यातूनच सदर दुकानाच्या गुजराती मालकासोबत त्यांचे खटके उडाले आणि मराठी माणसाचा अपमान केला गेला म्हणून आंदोलन केले, असे त्यांचे म्हणणे आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी