33 C
Mumbai
Friday, April 26, 2024
Homeमुंबईयेथील संस्कृती, परिस्थीती हा दृष्टीकोण समोर ठेवल्यास भारताचा विकास : मोहन भागवत

येथील संस्कृती, परिस्थीती हा दृष्टीकोण समोर ठेवल्यास भारताचा विकास : मोहन भागवत

भारताने चीन आणि अमेरिकेप्रमाणे विकसीत व्हायचे ठरवले तर भारताचा विकास होऊ शकणार नाही. भारताचा विकास हा भारताची दृष्टी, येथील परिस्थीती, लोकांची स्वप्ने, आशा, आकांक्षा, परंपरा, संस्कृती हा दृष्टीकोण समोर ठेवून प्रगती केल्यास भारत एक विकसित राष्ट्र बनेल असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत ( Mohan Bhagwat) यांनी मुंबईत एका कार्यक्रमात केले.

मुंबईत भारत विकास परिषदेच्या एका कार्यक्रमात मोहन भागवत आले होते. यावेळी ते म्हणाले, ‘आम्ही भारत आहोत, भामाशाह आमच्या पाठीशी आहे, तशी भारत विकास परिषद आहे. भारताच्या विकासाची स्वतःची दृष्टी आहे, स्वतःचा स्वभाव आहे. आपल्याकडे विकासाची चार साधने आहेत – अर्थ, काम, मोक्ष आणि धर्म. आणि भारत हा एक धार्मिक देश आहे, या गोष्टी भारताला इतर देशांपासून वेगळे करतो. भारताचा वसुधैव कुटुंबकम हा मंत्र आहे आणि सर्वांचा विकास हाच विकास आहे. मोहन भागवत म्हणाले, ‘भारताचे प्राचीन चारित्र्य पाहता भारत हे जगाला शांततेचा संदेश देणारा विश्वगुरू आहे. सगळे देश भारताला याच रूपात पाहतात. भारत विकास परिषदेच्या सर्व कार्यकर्त्यांनी भारताचे चारित्र्य आणि स्वरूप जाणून सेवा करताना जगले पाहिजे.

हे सुद्धा वाचा

एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे नुकसान नको; पटोलेंनी केली ‘ही’ मागणी

राज्य सरकारचा मोठा निर्णय, 1000 हून अधिक शिक्षकांची भरती करणार

कासवछाप मुंबई-गोवा महामार्गाच्या प्रगतीला वेग मिळणार, मंत्री रवींद्र चव्हाणांनी अधिकाऱ्यांना खडसावले !

मोहन भागवत आधी म्हणाले, ‘भारत मोठा होत आहे, म्हणूनच आज भारताला जी-20 मध्ये आमंत्रित आहेत. म्हणूनच आज आपण रशियाला लढाई थांबवायला सांगू शकतो. आधी म्हटलं असतं तर रशियाने आपल्याला हाकलून दिले असते, पण आज भारत समृद्ध होत आहे, त्यामुळे कुणीही आपल्याला असे म्हणू शकत नाही.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी