28.4 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeमुंबईनितेश राणेंनी आदित्य ठाकरेंना डिवचले; मांजराच्या अवतारातील वाघाचा फोटो टाकून उडविली खिल्ली

नितेश राणेंनी आदित्य ठाकरेंना डिवचले; मांजराच्या अवतारातील वाघाचा फोटो टाकून उडविली खिल्ली

टीम लय भारी

मुंबई : नारायण राणेंचे सुपुत्र आणि आमदार नितेश राणे हे कायमच सोशल मीडियावर काही ना काही पोस्ट करत असतात. बहुतेक वेळा ते आपल्या पोस्टच्या माध्यमातून महाविकास आघाडी सरकार आणि खास करून मंत्री आदित्य ठाकरे यांना उद्देशून पोस्ट करत असतात. आता देखील नितेश राणे यांनी ठाकरेंना उद्देशून एक फोटो फेसबुकवर पोस्ट केला आहे.

या फोटोमध्ये वाघाला मांजराचे तोंड लावण्यात आले आहे. या फोटोवर ‘एअरपोर्ट ते विधानभवनाचा रस्ता वरळीतूनच जातो.. माझं meow meow ऐकून थांबा बररर..का !!’ असे डिवचणारे विधान देखील लिहिण्यात आले आहे. याआधी देखील नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे अयोध्या दौऱ्याला गेलेले असताना त्या दौऱ्याला उद्देशून आदित्य ठाकरेंची खिल्ली उडवणारी पोस्ट केली होती.

नितेश राणेंनी आदित्य ठाकरेंना डिवचले; मांजराच्या अवतारातील वाघाचा फोटो टाकून उडविली खिल्ली

दरम्यान, या आत्ताच्या पोस्टनंतर काहींनी याला मजेशी उत्तर दिली आहेत. तर काही नेटकऱ्यांनी नितेश राणे यांना ट्रोल केले आहे. नितेश राणे यांच्या अशा पोस्ट नंतर कायमच शिवसेना समर्थक आणि नितेश राणे समर्थक यांच्यामध्ये कमेंटबॉक्समधून टीका-टिप्पणी करण्यात येत असते. राज्यातील राजकारण तापलेले असले तरी, यावर मजेशीर अशा पोस्ट व्हायरल करण्यात येत आहेत.

हे सुद्धा वाचा :

राज्यात सरकार पडायच्या तयारीत, पण आघाडी सरकारची काम सुरुचं

VIDEO : एकनाथ शिंदे आमदारांना घेवून गुवाहाटीलाच का गेले, माजी खासदार आनंद परांजपेंनी सांगितले अचंबित करणारे कारण !

राजकारणाच्या वादळावर सोशल मीडियावर ‘मिम्स’चा पाऊस

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी