29 C
Mumbai
Friday, May 3, 2024
HomeमुंबईIndian Railway Station : रेल्वे स्टेशनवर गुटखा, तंबाखु थुंकणाऱ्यांवर कारवाई होणे...

Indian Railway Station : रेल्वे स्टेशनवर गुटखा, तंबाखु थुंकणाऱ्यांवर कारवाई होणे गरजेचे

एकीकडे 'स्वच्छ भारत अभियान' राबवत असतांना रेल्वेच्या भींती तसेच बसण्याची बाके, खांब आपल्याला गुटखा आणि तंबाखुने रंगलेली दिसतात. अनेक वेळा रेल्वे कर्मचारी (Railway Station) ते पाण्याने स्वच्छ करतात. परंतु लोकं पुन्हा पुन्हा थुंकतच राहतात.

एकीकडे ‘स्वच्छ भारत अभियान’ राबवत असतांना रेल्वेच्या भींती तसेच बसण्याची बाके, खांब आपल्याला गुटखा आणि तंबाखुने रंगलेली दिसतात. अनेक वेळा रेल्वे कर्मचारी (Indian Railway Station) ते पाण्याने स्वच्छ करतात. परंतु लोकं पुन्हा पुन्हा थुंकतच राहतात. थुंकणाऱ्या घाणेरडया लोकांचा रेल्वे प्रशासनाने कायमचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे. पश्चिम रेल्वेकडून आज स्वच्छता अभ‍ियान राबवण्यात आले. या अभियानामध्ये बहूतेक स्टेश‍नची स्वच्छता करण्यात आली. नायगाव स्टेशनवर आज रेल्वे कर्मचारी आणि शाळेतील मुलांनी स्टेशन परिसर स्वच्छ केले. भारतातील बहूतेक लोक रेल्वेने प्रवास करतात. मात्र काही जण प्रवासादरम्यान रेल्वेमध्ये कचरा करतात.

प्लॅटफॉर्मवर देखील अनेक लोक कचरा फेकतात. अनके जण प्लॅटफॉर्मवरील कचरा कुंडीमध्ये कचरा टाकतात. परंतु अनेक जण कचरा कुंडीच्या बाहेर देखील कचरा टाकतात. त्यामुळे रोगराई पसरण्याची शक्यता असते. अल‍िकडे अनेक प्रवासी या स्वच्छता अभियानाला चांगला प्रतिसाद देत आहेत. स्वत:हून कचराकुंडीत कचरा टाकतात. असे असले तरी एक मोठी कचऱ्याची गंभीर समस्या आहे. ती म्हणजे गुटखा आणि तंबाखु खाऊन थुंकणे.

आपल्या देशात 100 पैकी 70 ते 80 टक्के लोक गुटखा किंवा तंबाखुचे सेवन करतात. त्यात पुरुषांचे प्रमाण सर्वाधिक आहे. ही माणसे गुटखा आणि तंबाखु खावून ते पायऱ्यांवर थुंकतात. भींतीवर थुंकतात. पटरीवर थुंकतात. चालू गाडीतून थुंकतात. एक्सप्रेसच्या डब्यात तर गुटख्याचा अतिशय घाणेरडा दर्प येतो. ही माणसं रेल्वेच्या टॉयलेटमध्ये देखील गुटखा खाऊन थुकतात. त्यामुळे वातावरण तर खराब होते. शिवाय रोगराई वाढण्यास मदत होते. त्यामुळे रेल्वेने जशी धुम्रपानावर बंदी आणली आहे. तशीच बंदी रेल्वे परिसरात गुटका तंबाखु खाण्यावर आणली पाहिजे.

Indian Railway Station : रेल्वे स्टेशनवर गुटखा, तंबाखु थुंकणाऱ्यांवर कारवाई होणे गरजेचे

व्यसनाधीन माणसं स्वत:च्या अरोग्याबरोबरच दुसऱ्यांचे आरोग्य देखील खराब करतात. तसेच अनेक वेळा रेल्वेच्या पटरीमध्ये प्लास्ट‍िकच्या पिशव्या आणि पाण्याच्या बाटल्या सर्रासपणे टाकल्या जातात. त्यामुळे प्रदूषण वाढत चालले आहे. रेल्वेचे ट्रॅक पावसाच्या पाण्यामुळे भरतात. त्याचा प्रवाशांनाच नाहक त्रास सहन करावा लागतो. रेल्वे प्रशासनाकडून गुटखा आणि तंबाखु खाऊ थुंकणाऱ्यांवर कारवाई केली जाते असे म्हणतात. पंरतु लोकं त्या कारवाईला जुमानत नाही.

हे सुद्धा वाचा

Ashish Shelar : अशिष शेलार म्हणाले, तो राजहंस एक…….

Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांना खेळायचीय 20-20 मॅच…

MMS Scandal in Bhopal: चंदीगडनंतर आता देशातील आणखी एका विद्यापीठातील एमएमएस स्कँडल उघड!

तसेच बहूते रेल्वे फलाटांवर भिकारी बसलेले, झोपलेले दिसतात. अनेक ठिकाणी भटके कुत्रे देखील प्लॅटफॉर्मवर फिरतांना द‍िसतात. त्यांचे नियोजन रेल्वे प्रशासनाने करणे गरजे आहे. भिकारी लोक आपल्या जवळचा कचरा तसा सोडून निघून जातात. अनेक वेळा असा कचरा पायदळी तुडवला जातो. रेल्वेस्थानके, रेल्वे डब्यात येणाऱ्या भ‍िकारी तसेच वेडया लोकांचे पुर्नवसन सरकारने करणे गजेचे आहे. त्यांच्यावर चांगले उपाय करुन त्यांना आनंदी जीवन जगात येण्यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न करणे गरजेचे आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी