29.4 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
Homeमुंबईराज ठाकरेंचे महाराष्ट्र सैनिकांना आदेश, 'पुरग्रस्तांना मदत करा'

राज ठाकरेंचे महाराष्ट्र सैनिकांना आदेश, ‘पुरग्रस्तांना मदत करा’

टीम लय भारी
मुंबई : महाराष्ट्रात अनेक येणाऱ्या संकटातून एक नवीन आपत्ती काही दिवसांपासून भेडसावते आहे. या पूरपरिस्थितीत आपण आपल्या बांधवाना मदत करावी असे आवाहन राज ठाकरे (Raj thackeray) यांनी केले आहे.

राज ठाकरे असेही म्हणाले, की महाराष्ट्र संपूर्ण अतिवृष्टीमुळे वाहत असताना पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. ही गोष्ट काही नवीन नाही. कोकणातील रायगड, रत्नागिरी, भागांत पुराचे पाणी जोमाने वाहत आहे तसेच उत्तर कोकणात सुद्धा ठाणे व पालघर च्या काही भागांत पुराचे पाणी साचले आहे. अशावेळी आपली स्वतःची व आपल्या कुटुंबाची काळजी घेत प्रत्येकाने आपणास जमेल तेवढी इतरांना मदत करावी. (Raj thackeray asks for maharashtrian’s help)

Breaking : पुरग्रस्तांच्या मदतीसाठी नौदलाची धाव, 7 तुकडया रायगड, रत्नागिरीला रवाना

राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंना लिहिले पत्र

उपनगरीय रेल्वे सेवा बंद असल्याने मुळात पुरग्रस्तांची कोंडी होत असल्याने व पुरामुळे खाजगी वाहतूक सेवा ठप्प झाल्याने नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. आजच राज ठाकरेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांस ज्यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे अशांसाठी रेल्वे सेवा सुरू करण्याविषयी पत्र पाठवले होते. त्यानंतर आता ते महाराष्ट्र वासीयांची मदत मागत आहेत. (Help those who have stuck in floods)

raj
राज ठाकरे

सद्य काळात लोकांचा जीव महत्त्वाचा आहे व येत्या पुढील काही दिवसात जसजसा पूर ओसरेल तसा रोगराईला पूर येण्याची शक्यता आहे. प्रतयेक मराठी माणसाने आपल्यातील सैनिकांचे रक्त जागवून मदतीसाठी हात पुढे सरसावण्याची गरज आहे. या मोठ्या संकटाला तोंड देताना आपल्याकडून काहीही कमी पडायला नको. असे म्हणत राज ठाकरेंनी महाराष्ट्र वासीयांप्रति असलेली काळजी व्यक्त केली (A letter sent to cm uddhav thackeray by raaj thackeray pleasing about railway for public)

मदतीसाठी बाहेर पडता येत नसल्यास घरी बसून काय मदत करता येईल तर प्रथम आपल्या संपर्कात असणाऱ्या स्वयंसेवकांना किंवा पुरात अडकलेल्याना संपर्क करून नियमित पाठपुरावा करावा.

राज ठाकरेंचे महाराष्ट्र सैनिकांना आदेश, 'पुरग्रस्तांना मदत करा'
राज ठाकरे

सोशल मीडियावर अनेक उलटसुलट खऱ्या खोट्या बातम्या येत असतात, त्यांची व्यवस्थित तपासणी करून खऱ्या आणि मदतीयोग्य पोस्ट च पुढे पाठवाव्यात. मदतीची गरज असणाऱ्यांचा आणि मदत करणाऱ्यांचा संपर्क जमल्यास करून घ्यावा. (While helping people, look for your safety)

‘चिपळूण शहराने पहिल्यांदाच पाहिला महाभयंकर पूर’

raj Thackeray writes to CM Uddhav Thackeray: Resume local train services in Mumbai for general public, else will hold demonstration

या काळात अनेक पैसे मागणारे खोटी बँक अकाउंट सुरू होतात. मदत करावयाची असल्यास आपल्या ओळखीतल्या माणसांनाच किंवा ठीक शहानिशा करूनच मदत करावी. व केलेल्या मदतीचा वेळोवेळी पाठपुरावा करावा.

या काळात मानसिक स्थैर्य राखणे खुप महत्त्वाचे असते, अडकलेल्यांना धीर द्यावा. एवढी मदत घरी बसून करता येण्याजोगी आहे.

https://youtu.be/xQlF5TF682I

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी