33 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeमुंबईसमृद्धी महामार्गावरून 3 महिन्यांत तब्बल 84 कोटींचा टोल वसूल

समृद्धी महामार्गावरून 3 महिन्यांत तब्बल 84 कोटींचा टोल वसूल

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) गतवर्षात 11 डिसेंबर 2022 रोजी समृद्धी महामार्ग (Samriddhi Highway) पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन केल्यानंतर अंशतः खुला केला. समृद्धी महामार्गाच्या 520 किलोमीटरच्या पट्ट्यात नागपूर ते शिर्डी दरम्यान एकूण 23 टोलनाके आहेत. याच दरम्यान एमएसआरडीसीने 11 डिसेंबर ते 12 मार्च 2023 या तीन महिन्यांत समृद्धी महामार्ग वरून 84 कोटी रुपये टोल वसूल केले आहेत. गेल्या तीन महिन्यांत 12 लाखांहून अधिक वाहनांनी एक्स्प्रेसवेचा वापर केला आहे, अशी माहिती एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक-II (JMD) संजय यादव यांनी दिली आहे.

समृद्धी महामार्ग किंवा नागपूर-मुंबई सुपर कम्युनिकेशन एक्स्प्रेस-वे वरून प्रवास करणाऱ्या हलक्या वाहनांच्या वापरकर्त्यांना प्रति किलोमीटर 1.73 रुपये टोल भरावा लागतो. याचा अर्थ अर्धवट उघडलेल्या सहा पदरी द्रुतगती मार्गावरून कारने प्रवास करणाऱ्या व्यक्तीला नागपूर ते शिर्डी प्रवासासाठी 899 रुपये मोजावे लागतील.

समृद्धी महामार्गाच्या 520 किलोमीटरच्या पट्ट्यात नागपूर ते शिर्डी दरम्यान एकूण 23 टोलनाके आहेत. शिर्डी ते मुंबई हा उर्वरित 181 किमीचा मार्ग जुलैपर्यंत पूर्ण करून नागपूर ते मुंबई दरम्यानचे संपूर्ण 701 किमीचे काम पूर्ण केले जाईल. त्याचप्रमाणे एक्स्प्रेसवेवर एकूण 13 पेट्रोल पंप कार्यरत आहेत. आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी टोइंग व्हॅन आणि मेकॅनिक देखील उपलब्ध आहेत आणि अपघाताच्यावेळी 21 द्रुत प्रतिसाद वाहने आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी एमएसआरडीसी वेगवान आणि ओव्हर पॅक वाहनांवर नियंत्रण ठेवत आहे. सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या लोकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी हे प्रादेशिक परिवहन कार्यालये (RTO) आणि राज्य महामार्ग पोलिस यांच्याशी समन्वय साधत आहे.

हे सुद्धा वाचा :

आता समृध्दी महामार्ग आणखी सुसाट होणार

पनवेल-इंदापूर सिंगल लेन मेपर्यंत पूर्ण करणार : रविंद्र चव्हाण

समृध्दी महामार्गावर उद्घाटनानंतर 24 तासातच भीषण अपघात, दोन कारची समोरासमोर टक्कर

कोणत्या वाहनाला किती टोल ?

टोलदरानुसार लाईट कर्मशिअल व्हेईकल, मालवाहतूक करणारे हलके वाहन किंवा मिनी बसला एका दिशेच्या प्रवासासाठी मुंबई ते नागपूर प्रवासासाठी 2.79 रूपये प्रति किलोमीटर दराने 1955 रूपये मोजावे लागतील. तिसऱ्या श्रेणीअंतर्गत बस किंवा ट्रकला (डबल एक्सेल)साठी 5.85 रूपये प्रति किलोमीटर म्हणजे 4 हजार 100 रूपये मोजावे लागतील. जड मालवाहतूक करणाऱ्या (थ्री एक्सेल) वाहनांसाठी 6.38 रूपये प्रति किलोमीटर किंवा 4 हजार 472 रूपये मोजावे लागतील. बांधकाम क्षेत्रातील मशीनरीच्या वाहनांना 9.18 रूपये प्रति किमी असे 6 हजार 435 रूपये आकारले जातील. शेवटच्या श्रेणीअंतर्गत मल्टी एक्सेल (सेव्हेन एक्सेल) वाहनांसाठी 11.17 रूपये म्हणजे 7 हजार 830 रूपये टोल मुंबई ते नागपूर प्रवासासाठी मोजावा लागणार आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी