33 C
Mumbai
Friday, April 26, 2024
Homeक्रीडाहाँगकाँग विरुद्धच्या विजयानंतर सूर्यकुमार यादवचे भारताचा कर्णधार रोहित शर्माने केले तोंड...

हाँगकाँग विरुद्धच्या विजयानंतर सूर्यकुमार यादवचे भारताचा कर्णधार रोहित शर्माने केले तोंड भरून कौतुक

भारतीय क्रिकेट संघाने बुधवारी झालेल्या हाँगकाँग (Hongkong) विरुद्धच्या सामन्यात विजय मिळवून आशिया कप (Asia Cup) क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम चार संघात प्रवेश मिळवला. मुंबईचा धडाकेबाज फंलदाज सूर्यकुमार यादव भारताच्या या विजयाचा शिल्पकार ठरला.

भारतीय क्रिकेट संघाने बुधवारी झालेल्या हाँगकाँग (Hongkong) विरुद्धच्या सामन्यात विजय मिळवून आशिया कप (Asia Cup) क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम चार संघात प्रवेश मिळवला. मुंबईचा धडाकेबाज फंलदाज सूर्यकुमार यादव भारताच्या या विजयाचा शिल्पकार ठरला. सामन्यानंतर पत्रकारांशी बोलताना भारताचा कर्णधार रोहित शर्माने सुर्यकुमार यादवच्या फंलदाजीची स्तुती करताना म्हटले की, माझ्याकडे सूर्यकुमार यादवच्या खेळीचे कौतुक करताना शब्द अपुरे पडत आहेत. एवढया भन्नाट फटकेबाजीचे प्रदर्शन त्याने केले.सूर्यकुमार यादवने २६ चेंडूत धडाकेबाज ६८ धावा, विराट कोहलीने ४४ चेंडूत केलेल्या ५९ धावा केल्या आणि रविंद्र जडेजाच्या चपळ क्षेत्ररक्षण केले. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियम मध्ये झालेल्या सामन्यात भारतीय संघाने हाँगकाँगच्या संघावर ४० धावांनी मात करून आशिया कप क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम चार संघात प्रवेश करणारा दुसरा संघ ठरला.

सूर्यकुमार यादव आणि विराट कोहली यांच्या तिसऱ्या विकेट साठी ९८ धावाची निर्णायक भागीदारी केली. रोहित शर्मा व के. एल. राहुलने भारताच्या डावाची सुरूवात करताना अनुक्रमे २१ व ३६ धावा केल्या. हाँगकाँगचे गोलंदाज आयुष शर्मा व मोहम्मद घझनफर यांना प्रत्येकी एक-एक बळी मिळवण्यात यश आले.

ganpati bappa contest

हे सुद्धा वाचा

NCP : हरियाणामधील एकता शक्ती पार्टीचे अध्यक्ष वीरेंद्र वर्मांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

​​Raj Bhavan : राजभवनचा निळाशार समुद्र, अभिनेता जॉकी श्रॉफ सुद्धा भारावला

Mantralaya News : बाळासाहेब पाटलांच्या खासगी सचिवांना जायचंय अतुल सावेंकडे !

हाँगकाँगच्या फंलदाजामध्ये बाबर हयात व किंचित शाह यांनी सर्वाधिक ४१ व ३० धावा केल्या. भारतीय गोलंदाजामध्ये भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, रविंद्र जडेजा व आवेश खान यांना प्रत्येकी एक बळी मिळवण्यात यश आले.
भारताच्या विजयावर भाष्य करताना रोहित शर्मा म्हणाला – आम्ही चांगली फंलदाजी करून हाँगकाँग साठी मोठे लक्ष्य उभे केले. आम्ही गोलंदाजीही चांगली केली परंतु मला वाटते की आम्हाला त्यात आणखी सुधारणा करण्याची गरज आहे.

सूर्यकुमारच्या खेळीचे वर्णन करताना मला शब्द अपुरे पडत आहेत. मला याची पूर्ण जाणीव आहे की तो एक प्रतिभावान फंलदाज आहे. कारण यापूर्वीही त्याने वेळोवेळी स्वत:ला सिद्ध केले आहे. मी आशा करतो की तो त्याची कामगिरी येत्या काळात आणखी उंचावेल व भविष्यात भारताच्या विजयात महत्वाची भूमिका बजावेल.

भारतीय संघाने प्रथम फंलदाजी करताना हाँगकाँग समोर १९३ धावांचे मोठे लक्ष्य उभे केले होते त्याला प्रत्युत्तर देताना हाँगकाँगच्या संघाने २० षटकात पाच खेळाडूंच्या मोबदल्यात केवळ १५२ धावा केल्या.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी