31 C
Mumbai
Thursday, May 2, 2024
Homeमुंबईकेंद्राच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहचण्यासाठी राज्याच्या यंत्रणेचे मोठे योगदान : उद्धव ठाकरे

केंद्राच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहचण्यासाठी राज्याच्या यंत्रणेचे मोठे योगदान : उद्धव ठाकरे

टीम लय भारी

मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव (Uddhav Thackeray) ठाकरे यांनी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या कार्यक्रमात योजनांच्या लाभार्थ्यां सोबत दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला. विविध केंद्रीय योजनांचा लाभ मिळालेल्या लाभार्थींना सहयाद्री अतिथीगृहातून संबोधण्यात आले. (Uddhav Thackeray dialogue with the beneficiaries)

“योजना केंद्राच्या असोत किंवा राज्यांच्या असोत, त्या सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचण्यासाठी राज्याच्या यंत्रणेचे मोठे योगदान असते. हे प्रयत्न पक्षभेद विसरून आणि राजकारणविरहित झाले पाहिजेत. मला आनंद व समाधान आहे की, या योजना राज्य, जिल्हा, तालुका पातळीवर प्रशासकीय यंत्रणेने नियोजनपूर्वक लाभार्थींपर्यंत यशस्वीरित्या पोहचविल्या.”,असे मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी व्यक्त केले.

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील प्रत्येक लाभार्थीशी संवाद साधून त्यांना योजनांचा लाभ कसा मिळाला तसेच त्यांच्या आणखी काही अपेक्षा (Uddhav Thackeray) आहेत का ते जाणून घेतले. ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी देखील आपले विचार व्यक्त केले. यावेळी मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

हे सुद्धा वाचा :- 

Shani needs to leave Maharashtra, says Navneet Rana in dig at CM Uddhav Thackeray

इमरान प्रतापगडी यांच्या राज्यसभेच्या उमेदवारीनंतर महाराष्ट्र काँग्रेसमध्ये नाराजी

पैगंबरांचा अवमान करणाऱ्या नुपूर शर्माच्या अटकेसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेस आक्रमक

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी