31 C
Mumbai
Thursday, May 2, 2024
Homeमहाराष्ट्रजामखेडच्या लोकांनी रोहितसारख्या एका तरूण कार्यकर्त्याला निवडून दिले : शरद पवार

जामखेडच्या लोकांनी रोहितसारख्या एका तरूण कार्यकर्त्याला निवडून दिले : शरद पवार

टीम लय भारी

कर्जत – जामखेड : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त जामखेड तालुक्यातील चौंडी येथे कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची उपस्थित होते. या कार्यक्रमात शरद पवारांनी (sharad pawar) विविध मुद्द्यावर भाष्य केलं. शरद पवार (sharad pawar) यांनी कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांचे कौतुक केले आहे.

त्यांनी आपल्या भाषणात म्हटले की, लोकांनी रोहितसारख्या एका तरूण कार्यकर्त्याला निवडून दिले आहे. आजचा हा सोहळा हा एकप्रकारे ऐतिहासिक सोहळा आहे. अहिल्यादेवींनी उभ्या आयुष्यामध्ये जे कर्तृत्व दाखवले ते नव्या पिढीपर्यंत पोहचविण्याचे काम या कार्यक्रमाच्या माध्यमातून होत आहे असं त्यांनी म्हटलं आहे.

आपल्या भाषणात ते म्हणतात की, कर्जत – जामखेड  हा सर्व भाग हा महाराष्ट्रातील दुष्काळी भाग आहे. या परिसरातील दुष्काळाचे दुखणे फार जुने आहे. उद्योगाचा प्रश्न सुटलेला नाही. मला आनंद एका गोष्टीचा आहे की इथल्या जनतेने  निवडणुकीमध्ये रोहीतसारख्या एका तरूण कार्यकर्त्याला चांगल्या पद्धतीने निवडून दिले.

त्याच्या हातामध्ये कामाची संधी दिली. मागील दोन अडीच वर्षांच्या कालावधीत अनेक कामे अशी झाली आहेत ज्यामध्ये अहिल्याबाईंच्या दृष्टीकोनाचा स्पर्श दिसावा. उदाहरणार्थ, अहिल्यादेवींनी आपल्या आयुष्यात पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी ठिकठिकाणी बारव केले. त्या बारवातून पाण्याची सुविधा केली.

इथल्या लोकांना त्यांची अपेक्षा विचारली तर ते फक्त पाणी सांगतात. रोहितने जबाबदारी घेतल्यानंतर संबंधित विभागाच्या मंत्र्यांना भेटून पाणी इथे कसे आणता येईल यासंबंधी अनेकदा बैठका घेतल्या. माझी खात्री आहे की येत्या कालखंडात पाण्याचा प्रश्न सोडविण्याची सुरुवात इथे पाहायला मिळेल असं पवार यांनी म्हटले आहे.

जामखेडच्या लोकांनी रोहितसारख्या एका तरूण कार्यकर्त्याला निवडून दिले : शरद पवार

हे सुद्धा वाचा: 

इमरान प्रतापगडी यांच्या राज्यसभेच्या उमेदवारीनंतर महाराष्ट्र काँग्रेसमध्ये नाराजी

Ex-Congress Leader Hardik Patel To Join BJP On June 2

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी