30 C
Mumbai
Friday, April 26, 2024
Homeराजकीय'मोदी सरकारचे अपयश लपवण्यासाठी भाजपाला बुस्टर सभा घ्याव्या लागत आहेत'

‘मोदी सरकारचे अपयश लपवण्यासाठी भाजपाला बुस्टर सभा घ्याव्या लागत आहेत’

टीम लय भारी 

मुंबई : प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथे महाराष्ट्र दिन व कामगार दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. केंद्रातील भारतीय जनता पक्षाचे सरकार सर्व आघाड्यांवर सपशेल फेल झालेले आहे. महागाई, बेरोजगारी, अर्थव्यवस्था, शेतकरी, कामगार यांच्या प्रश्नावर मोदी सरकारकडे सांगण्यासारखे काहीही नाही. मोदी सरकारचे हे अपयश लपवण्यासाठी भाजपाला बुस्टर सभा घ्याव्या लागत आहेत पण जनतेवर त्याचा काहीही परिणाम होणार नाही, असा टोला कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लगावला आहे. (Nana Patole criticizes BJP’s booster dose meeting)

महाराष्ट्र हे छत्रपती शिवाजी महाराज, शाहु, फुले, आंबेडकरांच्या विचाराने वाटचाल करणारे राज्य आहे. हा पुरोगामी विचारच राज्याला प्रगतीपथावर घेऊन गेला व तोच विचार राज्याच्या हिताचा आहे परंतु मागील काही वर्षांपासून महाराष्ट्रात जात्यांध्य व धार्मिक विचाराला पुढे करून राज्यात अशांतता निर्माण करण्याचे काम केले जात आहे, हा जात्यांध विचार थांबवण्याची गरज आहे, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे.

यावेळी बोलताना नाना पटोले पुढे म्हणाले की, राज्यात पुरोगामी विचार रुजलेला आहे, त्याला छेद देण्याचे काम काही लोक करत आहे. हा विचार राज्याच्या प्रगतीसाठी घातक आहे. केंद्रातील भाजपा सरकारने कामगार हिताच्या कायद्यामंध्य़े मोठे बदल करुन त्यांना देशोधडीला लावण्याचे काम केले आहे. मुठभर भांडवलदारांच्या दावणीला बांधून कामगारांचे हक्क व अधिकार हिरावण्याचे काम केले आहे पण कामगारांचे हक्क व अधिकार अबाधित ठेवण्यासाठी आपण काम करू.


हे सुद्धा वाचा :

मोदींच्या ‘अच्छे दिन’चे पाढे काँग्रेस पक्ष ठिकठिकाणी भोंग्यांवर वाचणार :  नाना पटोले

राज्यात धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांच्या सभांवर बंदी घाला!: नाना पटोले

ईडीची भिती दाखवणाऱ्या भाजपाला कोल्हापूरकरांनी जागा दाखवली : नाना पटोले

मुंबईकरांचा प्रवास होणार सुखकर, एसी लोकलच्या भाड्यात 50 टक्के कपात

When will PM Modi hold ‘mehengai pe charcha’, asks Nana Patole

l

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी