33 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
Homeराष्ट्रीयमनिष सिसोदियांच्या अडचणी वाढल्या! अबकारी प्रकरणात ईडी आज तिहार जेलमध्ये करणार चौकशी

मनिष सिसोदियांच्या अडचणी वाढल्या! अबकारी प्रकरणात ईडी आज तिहार जेलमध्ये करणार चौकशी

दिल्ली अबकारी प्रकरणी अंमलबजावणी संचालनालय (ED) आता मनीष सिसोदिया यांची चौकशी करणार आहे. मनीष सिसोदिया यांची तिहारच्या तुरुंग क्रमांक-1 मध्ये चौकशी केली जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अंमलबजावणी संचालनालयाचे एक पथक चौकशीसाठी दुपारी तिहार तुरुंगात पोहोचेल.

दिल्ली अबकारी प्रकरणी अंमलबजावणी संचालनालय (ED) आता मनीष सिसोदिया यांची चौकशी करणार आहे. मनीष सिसोदिया यांची तिहारच्या तुरुंग क्रमांक-1 मध्ये चौकशी केली जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अंमलबजावणी संचालनालयाचे एक पथक चौकशीसाठी दुपारी तिहार तुरुंगात पोहोचेल. अबकारी प्रकरणी दिल्लीचे माजी मुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांची ईडी पहिल्यांदाच चौकशी करणार आहे. अबकारी प्रकरणी मनीष सिसोदिया यांना दिल्ली न्यायालयाने 20 मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यांच्या जामिनावर 10 मार्चला सुनावणी होणार आहे.

‘पीटीआय’ने सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की, “अबकारी प्रकरणात ईडीने आणखी एक अटक केली आहे. त्यांनी हैदराबाद येथील मद्यविक्रेता अरुण रामचंद्र पिल्लई याला ताब्यात घेतले आहे. ईडीचे अधिकारी मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत सिसोदिया यांचे जबाब नोंदवतील.” सीबीआयने गेल्या महिन्यात सिसोदिया यांना या प्रकरणी अटक केली होती आणि सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत.

ईडीने आतापर्यंत 11 जणांना अटक केली आहे
प्रदीर्घ चौकशीनंतर सोमवारी (6 मार्च) सायंकाळी प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग कायद्याच्या (पीएमएलए) फौजदारी कलमांतर्गत पिल्लई याला ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने आतापर्यंत 11 जणांना अटक केली आहे. सूत्रांनी ‘पीटीआय’ला सांगितले की, “पिल्लईला स्थानिक न्यायालयात हजर केले जाईल, जेथे ईडी चौकशीसाठी त्याच्या कोठडीची विनंती करेल.”

हे सुद्धा वाचा

डॉ. विजय चोरमारे लिखीत नव्या पुस्तकाचे आज प्रकाशन !

साताऱ्यात भाजप-शिंदेगट आमने सामने! शंभुराज देसाई अन् उदयनराजेंचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले

सरकारच्या निषेधार्थ बळीराजाने केली कांद्याची होळी..!

मनीष सिसोदिया न्यायालयीन कोठडीत
दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू कोर्टाने सोमवारी आप नेते मनीष सिसोदिया यांना 20 मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. नॅशनल कॅपिटल टेरिटरी ऑफ दिल्ली (जीएनसीटीडी) च्या उत्पादन शुल्क धोरणाच्या निर्मिती आणि अंमलबजावणीमध्ये कथित अनियमिततेशी संबंधित प्रकरणातील चालू तपासात सिसोदियाला 26 फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली होती. या प्रकरणात मनिष सिसोदिया यांनी जामिनाची मागणी केली आहे. त्यांच्या जामिन अर्जावर 10 मार्च रोजी सुनावणी होणार आहे. मात्र त्याआधीच ईडीला या प्रकरणात आणखी एक महत्तवाचा आरोपी सापडला असल्याने मनिष सिसोदिया यांच्या अडचणीत वाढ झाली असल्याच्या चर्चांना उधानं आलं आहे.

सिसोदिया यांच्या न्यायालयीन कोठडीवर काय म्हणाले ‘आप’?
जोपर्यंत जामिनावर निर्णय होत नाही तोपर्यंत न्यायालयाला न्यायालयीन कोठडी वाढवण्याशिवाय पर्याय नाही, असे आपचे आमदार सौरभ भारद्वाज यांनी म्हटले आहे. आज सीबीआयकडे कोणताही प्रश्न नव्हता, ज्यासाठी त्यांनी मनीष सिसोदिया यांच्या चौकशीची मागणी केली असती, 10 मार्चला जामिनावर सुनावणी होणार आहे, त्यानंतर त्यांना जामीन मिळतो की रिमांड वाढवायचा याचा निर्णय होईल. अशा शब्दांत याप्रकरणात आपने सावध भुमिका घेतली असल्याचे दिसत आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी