30 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
Homeराष्ट्रीयवाघाच्या 'वाटेला जाणे' पडले महागात, काही सेकंदातच खेळ खल्लास !

वाघाच्या ‘वाटेला जाणे’ पडले महागात, काही सेकंदातच खेळ खल्लास !

टीम लय भारी

मुंबई : रणथंबोर हे एक पर्यटकांच्या पसंतीचे राजस्थानमधील अभयारण्य आहे. हे अभयारण्य वाघांसाठी प्रसिध्द आहे. अनेक पर्यटक टी 120 वाघाला पाहण्यासाठी येतात. या अभयारण्यात टी 120 या वाघाची दहशत आहे. तो झोपला, असतांना एक कुत्रा त्याच्या जवळ आला तर लगेच झापेतून उठून त्याने कुत्र्यावर हल्ला केला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठया प्रमाणात व्हायरल झाला आहे.

यापूर्वी त्याने अनेक वेळाअस्वल , हरणाची शिकार केली होती. त्याने अनेकवेळा बिबटयावर हल्ला केल्याचे व्हिडीओ देखील यापूर्वी प्रसिध्द झाले आहेत.23 मार्च 2021 रोजी तो रणथंबोरच्या झोन 2 मध्ये दाखल झाला. त्याचा जन्म लाहपूरमध्ये 2018 साली झाला. टी 63 ए म्हणजेच ‘चंद्रा‘ वाघीणीचा तो मुलगा आहे.वाघाच्या शिकारीसाठी रणथंबोरचे अभयारण्य ‘नंदनवन’ बनले आहे.

अनेक वेळा या ठिकाणी चोरटी शिकर केली जाते. त्या शिकारीला वाघांचे आपसातले युध्द घोषीत केले जाते. तरुण वाघ वृध्द वाघांना मारुन टाकतो आणि परिसरात तो आपला दबदबा तयार करतो. हा वाघांचा विशेष गुणधर्म आहे. त्याला ‘टेरोटेरियल फाइट ‘ असे म्हणतात.

रणथंभोर व्याघ्रप्रकल्प राजस्थानमधील सवाई माधोपूर जिल्हयात आहे. जयपूरपासून सुमारे130 किमी अंतरावर आहे. या अभयारण्याच्या उत्तरेला ‘बनास‘ नदी वाहते. तर दक्षिणेकडे ‘चंबळ‘ नदी वाहते. अभयारण्याच्या मध्यभागी ‘रणथंबोरचा किल्ला‘ आहे. विशेष म्हणजे या किल्ल्यात वाघांनी आपला संसार थाटला आहे.

हे सुध्दा वाचा:

प्राजू कुठे आहेस ?..काय धुकं…काय पाऊस…काय डोंगर… लय मज्जा..हाय !

सांगली हत्याकांडाचा आज होणार संपुर्ण उलगडा, पोलिस करणार पर्दाफाश

तुमच्या ‘अश्रूंशी’ मी गद्दारी करणार नाही

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी