31 C
Mumbai
Friday, March 29, 2024
Homeराष्ट्रीयतब्बल 72 वर्षे तारिख पे तारिख; अखेर देशातील सर्वात जुना खटला निकाली!

तब्बल 72 वर्षे तारिख पे तारिख; अखेर देशातील सर्वात जुना खटला निकाली!

भारतीय न्यायव्यवस्थेत तारिख पे तारिख काही नवे नाही. याच चक्रात पिरगळून निघालेला देशातील सर्वात जुना खटला अखेर निकाली निघाला आहे. या खटल्यात तब्बल 72 वर्षे तारिख पे तारिख सुरू होती. कानून के हात, पाय, न्याय सारे काही लंबे असते, हाच अनुभव यातून आला.

अखेर एकदाचा देशातील सर्वात जुना खटला निकाली निघाला आहे. या खटल्यात तब्बल 72 वर्षे तारिख पे तारिख सुरू होती. भारतीय न्यायव्यवस्थेत तारिख पे तारिख काही नवे नाही. याच चक्रात पिरगळून निघालेल्या या खटल्यात कानून के हात, पाय, न्याय सारे काही लंबे असते, हाच अनुभव यातून आला.

देशातील सर्वात जुन्या उच्च न्यायालयापैकी एक असलेल्या कोलकाता हायकोर्टाच्या खंडपीठाने हा भारतातील प्रदीर्घ खटल्याचा निकाल दिला आहे. कोलकाता हायकोर्टाचे वर्तमान मुख्य न्यायाधीश प्रकाश श्रीवास्तव यांचा जन्मच मुळी हा खटला दाखल झाल्यानंतर दहा वर्षांनी झाला आहे. 1951 मध्ये दाखल झालेला हा देशातील सर्वात जुना खटला होता. पूर्वीच्या बेहरामपूर बँक लिमिटेडच्या लिक्विडेशन प्रक्रियेशी संबंधित हा खटला होता. 72 वर्षांनी अखेर तो संपला आहे.

देशातील पाच सर्वात जुन्या प्रकरणांपैकी दोन प्रकरणे अजूनही प्रलंबित 

बेहरामपूर बँक निकालानंतरही कोलकाता उच्च न्यायालयाकडे देशातील पाच सर्वात जुन्या प्रलंबित प्रकरणांपैकी दोन प्रकरणे अजून प्रलंबित आहेत. हे दोन्ही खटले 1952 मध्ये दाखल करण्यात आले होते. उर्वरित तीन प्रकरणांपैकी दोन दिवाणी खटले बंगालमधील मालदा दिवाणी न्यायालयात आहेत, तर अन्य एक मद्रास उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. या वादग्रस्त प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी मालदा न्यायालयाने मार्चमध्ये सुनावणी ठेवली आहे.

हे सुद्धा वाचा : 

Mumbai News : मुंबई हायकोर्टाचे नाव आता महाराष्ट्र हायकोर्ट? वाचा काय म्हणाले सुप्रीम कोर्ट

आयकर उपायुक्ताला कोर्टाचा दणका; अवमानप्रकरणी 7 दिवसांची पोलिस कोठडी!

Sanjay Raut :संजय राऊत प्रकरणी स्वप्ना पाटकर यांना कोर्टाकडून दिलासा नाही

Indias oldest Pending Case, Pending Case Since 72 Years Settled, तब्बल 72 वर्षे तारिख पे तारिख, देशातील सर्वात जुना खटला निकाली, Calcutta High Court

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी