30 C
Mumbai
Wednesday, August 3, 2022
घरराष्ट्रीयमोदी सरकारच्या काळात ईडीचे फावले? अर्थमंत्र्यांकडून 'हे' स्पष्टीकरण

मोदी सरकारच्या काळात ईडीचे फावले? अर्थमंत्र्यांकडून ‘हे’ स्पष्टीकरण

टीम लय भारी

दिल्ली : काॅंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना ईडीने दुसऱ्यांदा चौकशीसाठी बोलावणे धाडल्यामुळे देशात काॅंग्रेस चांगलाच आक्रमक झाला आहे. रस्त्यावर उतरत निदर्शने करीत सत्तेसाठी ईडीचा गैरवापर करत असल्याचा आरोप काॅंग्रेस कडून करण्यात येत आहे. या ईडीच्या मायाजाळात केवळ काॅंग्रेस पक्ष नाही तर शिवसेना, राष्ट्रवादी काॅंग्रेस, तृणमूल काॅंग्रेस अशा अनेक पक्षांच्या खांद्यावर बंदूक ठेवत त्यांना अडकवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. दरम्यान यात पार्श्वभूमीवर ईडीने टाकलेल्या छाप्यांचा तपशील राज्यसभेत नुकताच सादर करण्यात आला त्यामध्ये मोदी सरकारच्या काळात ईडीने टाकलेल्या छाप्यांमध्ये जवळपास 27 पट वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे.

राज्यसभेत सादर केलेल्या माहितीनुसार 2014-2022 या वर्षांत 3,010 इतक्या ईडी कारवाया करण्यात आल्या असून  2004-2014 या कालावधीत केवळ 112 ईडी कारवाया करण्यात आल्या असल्याची धक्कादायक माहिती सादर करण्यात आली. त्यामुळे तब्बल 27 पट छाप्प्यांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. जेव्हा मनी लाॅंन्डरींग बाबत कायदा आला तेव्हा सुद्धा पहिल्या नऊ वर्षांत तुलनेने खूप कमी कारवाई करण्यात आल्याची आकडेवारी समोर आली आहे. या काळात 104 तक्रारी दाखल झाल्या ज्यामध्ये कोणावरही आरोप सिद्ध झाले नाहीत.

दरम्यान, या ईडी कारवाईच्या वाढच्या आकडेवारीवर मंत्री पंकज चौधरी यांनी लेखी उत्तर देत स्पष्टीकरण दिले आहे. यामध्ये चौधरी लिहितात, प्रलंबित प्रकरणं निकाली काढण्यासाठी ईडीकडून कारवाईचा धडाका सुरु आहे. त्यामुळे 2014च्या आधी तपासात ढिलाईपणा आणि दिरंगाई करण्यात आली होती, तशी दिरंगाई आणि ढिलाईपणा न करता वेगानं प्रकरण निकाली काढण्यासाठी ईडी कारवाया वाढल्या असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे.

हे सुद्धा वाचा…

सामाजिक कार्यकर्त्या सुषमा अंधारे हाती बांधणार शिवबंधन

अजित पवारांची थेट शेतकऱ्यांसोबत बांधावर चर्चा

प्रवाशांची पंचाईत! टॅक्सी, ऑटो चालकांचा 1 ऑगस्टपासून बेमुदत संप

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!