28 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeराष्ट्रीय‘जागतिक दहशतवादी’ दाऊद इब्राहिम याच्यावर राष्ट्रीय अन्वेषण अभिकरणाने (NIA) २५ लाखांचे बक्षीस...

‘जागतिक दहशतवादी’ दाऊद इब्राहिम याच्यावर राष्ट्रीय अन्वेषण अभिकरणाने (NIA) २५ लाखांचे बक्षीस जाहीर केले

राष्ट्रीय अन्वेषण अभिकरण (NIA) ने ‘अंतरराष्ट्रीय दहशतवादी’ दाऊद इब्राहिम याच्यावर २५ लाखांचे बक्षीस जाहीर केले. जेणेकरून त्याची अटक करण्यात सुरक्षा यंत्रणांना मदत मिळेल. (National Investigation Agency) ने दाऊद इब्राहिमचा नवीन फोटो सुद्धा जारी केले. राष्ट्रीय अन्वेषण अभिकरण (NIA) ने दाऊद इब्राहिमचा हस्तक छोटा शकील, जावेद चिकना आणि टायगर मेनन यांच्यावर सुद्धा प्रत्येकी १५ लाखांचे बक्षीस जाहीर केले.

राष्ट्रीय अन्वेषण अभिकरण (NIA) ने ‘अंतरराष्ट्रीय दहशतवादी’ दाऊद इब्राहिम याच्यावर २५ लाखांचे बक्षीस जाहीर केले. जेणेकरून त्याची अटक करण्यात सुरक्षा यंत्रणांना मदत मिळेल. (National Investigation Agency) ने दाऊद इब्राहिमचा नवीन फोटो सुद्धा जारी केले. राष्ट्रीय अन्वेषण अभिकरण (NIA) ने दाऊद इब्राहिमचा हस्तक छोटा शकील, जावेद चिकना आणि टायगर मेनन यांच्यावर सुद्धा प्रत्येकी १५ लाखांचे बक्षीस जाहीर केले. हे सर्व मुंबई १९९३ च्या साखळी बॉम्बस्फोट मालिकेचे आरोपी आहेत. राष्ट्रीय अन्वेषण अभिकरणाने जारी केलेल्या परिपत्रकात नमूद केले की, दाऊद इब्राहिम आणि त्याचे सहकारी यांचे दशहतवादी संघटना लष्कर-ए-तोयब्बा, जैश-ए-मोहम्मद आणि अल कायदा यांच्याशी घनिष्ठ संबंध आहेत. त्या दहशतवादी संघटनांच्या सहाय्याने तो भारतात समाज विघातक कारवाया करत आहे.

देशाच्या सर्वोच्‍च केंद्रीय सुरक्षा यंत्रणेने हे सुद्धा स्पष्ट केले की, दाऊद इब्राहिम आणि त्याचे हस्तक भारतात बेकायदेशीर रित्या शस्त्रांची तस्करी करणे, मनी लाँड्रिंग, अंडर-वर्ल्डच्या गुन्हेगारी कारवाया, नकली नोटांचा व्यवसाय, स्वत:ची मालमत्ता वाढवण्याच्या हेतुने बेकायदेशीर पद्धतीने मालमत्तेचा ताबा यासारख्या प्रकरणांमध्ये सामिल आहेत.

ganpati bappa contest

हे सुद्धा वाचा

Digital Rape : देशात पहिल्यांदाच ‘डिजीटल रेप’ प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा

Brahmastra : रणबीर-आलियाचा ‘ब्रह्मास्त्र’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

Nana Patole : हिंदुत्त्वाचा डंका मिरवणाऱ्या इव्हेंटबाज सरकारनेच हिंदू शेतकऱ्यांना सोडले वाऱ्यावर- नाना पटोले

संयुक्त राष्ट्रसंघाने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद ठराव १२६७ अन्वये दाऊद इब्राहिमचा जागतिक दहशतवादयांच्या यादीत समावेश केला आहे. दाऊद इब्राहिमची अनीस इब्राहिम, छोटा शकील, जावेद चिकना आणि टायगर मेनन यांच्या मदतीने ‘डी’ कंपनीच्या नावाने भारतात दहशतवादी कारवायांना खतपाणी घालत असल्यामुळे यूएपीए (Unlawful Activities Prevention Act) कायद्याच्या चौथ्या परिशिष्टात त्याचा समावेश करण्यात आला आहे.

दाऊद इब्राहिम हा मुंबई १९९३ च्या साखळी बॉम्बस्फोट मालिकेच्या मुख्य आरोपींपैकी एक आहे. भारतीय गुप्तचर यंत्रणांच्या माहितीनुसार तो सध्या पाकिस्तानात वास्तव्यास आहे. दाऊद इब्राहिम आणि त्याच्या सहकाऱ्यांनी १९९३ साली मुंबईच्या महत्त्वाच्या बारा ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून आणले होते. या दुर्देवी घटनेमध्ये २५७ लोकांचा नाहक बळी गेला आणि ७०० जण गंभीर जखमी झाले होते. दाऊद इब्राहिमने पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय (ISI) च्या मदतीने या घटनेला प्रत्यक्षात आणले. तेव्हापासून दाऊद इब्राहिम आणि त्याचे सहकारी भारतातून पसार झाले आहेत. त्या घटनेच्या जवळपास २९ वर्षांनी सुद्धा भारतीय सुरक्षा यंत्रणांना त्यांना जेरबंद करण्यास यश आलेले नाही.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी