29.4 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
Homeराष्ट्रीयरामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी पुणे ते आयोध्या ट्रेनची सुविधा

रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी पुणे ते आयोध्या ट्रेनची सुविधा

रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी देशभरातून अनेक भक्तगण येणार आहेत. अनेक दिवसांपासून रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेची चर्चा होती. २२ जानेवारी दिवशी संपूर्ण देशाचं स्वप्न आता सत्यात उतरणार आहे. अनेक महिन्यांपासून रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी देशभरातून उद्योजक, कलाकार, विरोधी पक्षनेते आपली उपस्थिती दाखवणार आहेत. अशातच आता रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी रेल्वेविभागाने पुढाकार घेतला आहे. पुणे ते आयोध्या असा रेल्वेने प्रवास करण्यात यावा यासाठी १५ रेल्वेगाड्यांची सोय केली आहे. यामुळे आता जसजसा रामलल्लाचा प्राणप्रितिष्ठा सोहळा जवळ येत आहे तसा तो आणखीच चर्चेचा विषय ठरत असून त्यानिमित्ताने आणखी काही बाबी उलगडताना दिसत आहेत.

रेल्वेविभागाकडून ३० जानेवारीपासून रेल्वेगाड्या रामलल्लाच्या दर्शनासाठी जाणार आहे. यासाठी एकूण १५ रेल्वेगाड्या सोडण्यात येणार आहेत. दोन दिवसाआड एक रेल्वेगाडी सोडण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. तर अशातच देशभरातून एकूण २०० रेल्वेगाड्यांचे नियोजन रेल्वेविभागाकडून करण्यात आलं आहे. या रेल्वेगाड्या स्लिपर कोच असणार आहेत. पुणे-अयोध्या-पुणे रेल्वेसाठी तीन रॅकचा वापर केला जाणार असल्याची शक्यता असल्याची माहिती आता समोर येत आहे.

हे ही वाचा

गोरेगाव फिल्मसिटी, राष्ट्रीय उद्यान होणार चमकदार

शिक्षणाला वय नसतं, अक्षय कुमारची पत्नी ट्विंकल खन्नानं ५० व्या वर्षी मिळवली पदव्युत्तर पदवी

‘चल रे खोक्या टुनुक टुनुक’

रेल्वेमध्ये मावणार दीड हजार प्रवासी

आयोध्येहून पुण्याला जाण्यासाठी १५ रेल्वेगाड्या सोडण्यात येणार आहेत. एका रेल्वेगडीमध्ये दीड हजार प्रवासी मावतील एवढी जागा एका ट्रेनमध्ये आहे. या गाड्यांची बुकींग लवकरच सुरू होणार आहे. गाड्यांना मिळणारा प्रतिसाद पाहता आणखी रेल्वेगाड्यांच्या संख्येमध्ये वाढ करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली. पुण्याहून आता नेमक्या कोणत्या रेल्वेगाड्या धावतील याबाबत कोणतीही माहिती नाही. मात्र याबाबत लवकरात लवकर काही अपडेट मिळतील.

‘या’ राज्यातून रेल्वेगाड्यांची सोय

दिल्ली, गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गोवा, तेलंगणा, जम्मू-काश्मीर येथून अयोध्येला जाण्यासाठी आस्था स्पेशल ट्रेनची सोय करण्यात आली आहे. देशभरातून २०० रेल्वेगाड्या धावणार आहेत. या ट्रेनच्या माध्यमातून लाखो लोकं आयोध्येला जाऊ शकणार आहे.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी