28 C
Mumbai
Tuesday, February 27, 2024
Homeराजकीयगोरेगाव फिल्मसिटी, राष्ट्रीय उद्यान होणार चमकदार

गोरेगाव फिल्मसिटी, राष्ट्रीय उद्यान होणार चमकदार

मुंबईमधील अनेक उद्योगधंदे हे गुजरातला घेऊन जात होते. मात्र आता मुंबईतील अनेक वर्षांपासून असलेली गोरेगाव फिल्मसिटीला देखील परराज्यामध्ये घेऊन जाण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. मात्र त्यावर विरोधकांनी विरोध दर्शवला. अशातच आता याच गोरेगाव फिल्मसिटीचा विकास करण्यासाठी तसेच बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान ही दोन स्थळे जगातील सर्वोत्तम विकसित करण्यासाठी सरकारकडून निधी उपलब्ध करून दिला जाणार असल्याचं वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आश्वासन दिलं आहे. संजय गांधी उद्यानात इलेक्ट्रिक गाड्या आणि व्याघ्र दर्शन करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार?

‘राज्यात राबविण्यात येत असलेल्या वृक्षारोपण अभियानामुळे राज्यात वनक्षेत्र वाढत आहे. राज्यामध्ये वन विभागाला वृक्षरोपण करण्यामागे जनतेचं यश आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा वनासंबधी असलेला संकल्प अनुपालन होणं गरजेचं आहे. आईप्रमाणे वनराईची सेवा अनमोल आहे. वन संवर्धनाची कामे मिशन मोडवर करण्यासाठीं आणि वन क्षेत्राच्या विकासाचा गोवर्धन उचलण्यास आपण सर्वांनी सहभागी होऊया’, असं आवाहन त्यांनी केलं आहे.

हे ही वाचा

शिक्षणाला वय नसतं, अक्षय कुमारची पत्नी ट्विंकल खन्नानं ५० व्या वर्षी मिळवली पदव्युत्तर पदवी

‘चल रे खोक्या टुनुक टुनुक’

‘राम एक नाही, ‘ब्रिटीश म्युझियममधील राम वेगळा’

संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये आहे. यामुळे या भागातील विकासकामांना प्राधान्य देत नागरिकांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याचं काम केलं जाणार आहे. वनविभागासाठी गठित केलेल्या समित्यांनी आपले प्रस्ताव तसेच इतर काही समस्या वनविभागाकडे पाठवाव्यात. यावेळी आता शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी सध्या चर्चेत असल्याचं अनेकदा पाहायला मिळत आहेत. त्यांनी देखील या विकासकामांवर भाष्य केलं आहे.

काय म्हणाले राजू शेट्टी?

‘संजय गांधी राष्ट्रीय उद्यायनामध्ये अनेक पर्यटक पर्यटनासाठी येणार आहेत. त्यासाठी याला जास्तीत जास्त निधी द्यावा. पर्यटकांसाठी होत असलेल्या कामांबरोबरच स्थानिकांनाही येथे रोजगार उपलब्ध व्हावा’, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

प्रवीण दरेकर काय म्हणाले?

‘संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात होत असलेल्या विविध कामांमुळे उद्यानात अधिक जिवंतपणा आला’ असल्याचे आमदार प्रवीण दरेकर यांनी सांगितले. तसेच ‘संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाजवळ असणाऱ्या रहेजा वसाहती संदर्भातील प्रश्न वन विभागाने प्राधान्याने सोडवावा’, असं प्रवीण दरेकर म्हणाले आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी