33 C
Mumbai
Wednesday, April 24, 2024
Homeराष्ट्रीयसाकेत गोखलेंना नडले मोदींच्या मोरबी भेटीचे ट्विट, गुजरात पोलिसांनी केली अटक!

साकेत गोखलेंना नडले मोदींच्या मोरबी भेटीचे ट्विट, गुजरात पोलिसांनी केली अटक!

ऑल इंडिया तृणमुल कॉंग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते साकेत गोखले यांना गुजरात पोलिसांनी जयपूर विमानतळावर अटक केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मोरबी भेटीबाबत चुकीचे ट्वीट केल्याचा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला आहे. पोलिसांनी गोखले यांना अहमदाबाद न्यायालयात हजर केले. त्यावेळी त्यांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

ऑल इंडिया तृणमुल कॉंग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते साकेत गोखले यांना गुजरात पोलिसांनी जयपूर विमानतळावर अटक केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मोरबी भेटीबाबत चुकीचे ट्वीट केल्याचा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला आहे. पोलिसांनी गोखले यांना अहमदाबाद न्यायालयात हजर केले. त्यावेळी त्यांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. आता गोखले यांच्या बचावासाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी देखील मैदानात उतरल्या आहेत.

गोखले यांना जयपूर विमानतळावरुन नाट्यमय अटक करण्यात आली. दिल्लीहून रात्री निघून जयपूर विमानतळावर पोचलेल्या गोखले यांना गुजरात पोलिसांनी अटक केली. गुजरातचे पोलिस गोखले यांच्या आगमनाची प्रतिक्षा करत विमानतळावर थांबले होते. मध्यरात्री गोखले यांना अटक करण्यात आल्याची माहिती तृणमुल कॉंग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते खासदार डेरेक ओ ब्रायन यांनी दिली. गोखले यांनी त्यांच्या आईला फोन करुन पोलिसांच्या कारवाईची माहिती दिली.

गुजरातमध्ये ऑक्टोबर महिन्यात मोरबी पुल कोसळून १३५जणांचा मृत्यू झाला होता. त्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १ नोव्हेंबर रोजी भेट देऊन जखमींसोबत चर्चा केली होती. मोदी यांच्या मोरबी दौऱ्यावर ३० कोटी रुपये खर्च झाल्याचा आरोप गोखले यांनी ट्वीटद्वारे केला होता. त्यामुळे भाजपचे नेते कोठारी यांनी गोखले यांच्याविरोधात तक्रार नोंदवली त्यानंतर गोखले यांना अटक करण्यात आली. गोखले यांनी ट्वीट करताना एक छायाचित्र वापरले असून स्थानिक गुजराती वर्तमानपत्रातील बातमी असल्याचा दावा केला होता, तसेच ही माहिती आरटीआयद्वारे मिळाल्याचे ट्वीट केले होते.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री व तृणमुल कॉंग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी साकेत गोखले यांच्या अटकेचा निषेध केला आहे. गोखले यांनी कोणतीही चूक केली नाही, असे बॅनर्जी म्हणाल्या. आपल्याविरोधात अनेक खोटे ट्वीट केले जातात, असे त्या म्हणाल्या.

हे सुध्दा वाचा :

जुळ्या बहिणींचा दादला बनलेल्या टॅक्सी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

राज ठाकरेंनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना विशेष पोस्ट करून वाहिली आदरांजली

शरद पवार मैदानात उतरले; कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना सज्जड इशारा

साकेत गोखले यांच्या ट्वीटविरोधात भाजप नेते कोठारी यांनी अहमदाबाद येथील सायबर क्राईम सेलमध्ये तक्रार नोंदवली होती. त्यानंतर अहमदाबाद पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरु केला होता. अहमदाबाद न्यायालयात पोलिसांनी अधिक तपासासाठी ३ दिवसांची पोलिस कोठडी मागितली होती मात्र न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. गोखले यांच्याविरोधात भा.दं.वि. ४६९, ४७१, ५०१, ५०५ (बी) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

साकेत गोखले यांना न्यायालयात हजर करताना ते पत्रकारांशी म्हणाले,मोरबी पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेसाठी पुलाची दुरुस्ती करणाऱ्या ओरेवा कंपनीच्या मालकाविरोधात अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आली नाही, मात्र मला केवळ ट्वीट केल्याने अटक करण्यात आली.

Saket Gokhale Arrested By Gujarat Police

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी