29.4 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
Homeराजकीयएनसीबी भाजपची बटीक आहे, राष्ट्रवादीचा टोला

एनसीबी भाजपची बटीक आहे, राष्ट्रवादीचा टोला

टीम लय भारी

मुंबई : मुंबईत क्रूझवर टाकलेल्या छापेमारीत एनसीबीने ड्रग्स पार्टीचा पर्दाफाश केला होता. यात शारुख खानचा मुलगा आर्यन खान सह ८ जणांना एनसीबीने ताब्यात घेतले आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीने भाजपला टोला मारला आहे. एनसीबी भाजपची बटीक आहे, असे विधान राज्य समन्वयक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (ओबीसी सेल) राज राजापूरकर यांनी केले आहे (NCP blamed the BJP for the NCB’s actions).

अंमली पदार्थांच्या कारवाई प्रकरणात भाजपचा मेहुणा सापडला होता. परंतु, त्याला सोडून दिल्याचे समोर आले होते. यावरून असे स्प्ष्ट होत आहे की, एनसीबी संस्था ही भाजपची बटीक आहे. असे वक्तव्य राज राजापूरकर यांनी केलेआहे. राजापूरकर यांनी ट्विट करत भाजपवर ही टीका केली आहे.

भाजपानं शेतकऱ्यांची हत्या करण्याचं पाप केलं; शरद पवार संतापले

एनसीबीने भाजप नेत्याच्या मेव्हण्याला सोडलं, शनिवारी व्हिडिओ पुरावे सादर करुन करणार पर्दाफाश

 

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत एक मोठा खुलासा केला होता. एनसीबीने क्रूझवर केलेल्या कारवाईत १० जणांना ताब्यात घेतले होते. त्यातील २ जणांना सोडण्यात आलं होतं. यामध्ये भाजप नेत्याच्या मेहुणाचा समावेश आहे. असा दावा मलिक यांनी पत्रकार परिषदेत केला होता.

ज्या देशात सुई सुद्धा निर्माण होत नव्हती तिथे आज रेल्वेची इंजिन तयार होतात : शरद पवार

Mumbai cruise drugs case: NCP warns of another expose on Narcotics Control Bureau

एनसीबी भाजपची बटीक आहे, राष्ट्रवादीचा टोला

त्यांच्या या वक्तव्याने खळबळ माजली आहे. मी उद्या दि. ९ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता या संबंधात पुरावे सादर करणार आहे. पत्रकार परिषद घेऊन मी पुरावे सादर करणार आहे, असे नवाब मलिक म्हणाले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी