31 C
Mumbai
Thursday, May 2, 2024
Homeराजकीयराष्ट्रवादीच्या 'या' नेत्याचे मोठे वक्तव्य

राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याचे मोठे वक्तव्य

टीम लय भारी

जळगाव : राज्यातील माहविकास आघाडी सरकारची सत्ता १० मार्चपर्यंत जाईल असं वक्तव्य भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंनी चांगल्या शब्दात उत्तर दिलं आहे. चंद्रकांत पाटील हे सत्तेतून बाहेर पडल्याने अस्वस्थ झाले आहेत, असा टोला खडसेंनी लगावला आहे. इतकच नाही तर त्यांनी हे सरकार पडल्यास पुन्हा हेच सरकार येईल असंही म्हटलंय(NCP leader' big statement on chandrakant patil comment).

चंद्रकांत पाटील म्हणाले, “राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीतील अंतर्गत मतभेद उफाळले आहेत आणि आघाडीचे मंत्री एकापाठोपाठ तुरुंगाच्या दिशेने जात आहेत. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल १० मार्च रोजी लागल्यानंतर अशी स्थिती निर्माण होईल की, महाविकास आघाडीला सत्तेवरून जावे लागेल.”, त्यांनी पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं.

चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या या टीकेवर भुसावळ येथील एका कार्यक्रमात एकनाथ खडसेंनी उत्तर दिलंय. “चंद्रकांत पाटील हे उत्तम भविष्यकार असून महाविकास आघाडी सरकार पडणारच आहे. यासाठी त्यांनी अनेकवेळा तारखा जाहीर केल्यात. मात्र चंद्रकांत पाटील सत्तेतून बाहेर पडल्याने ते अस्वस्थ झाले आहेत. सत्तेत नसल्याने त्यांना वणवण फिरावे लागत असल्याने ते अशा प्रकारचे वक्तव्य करत आहेत,” असे म्हटले आहेत. 

हे सुद्धा वाचा

चक्क कार्यक्रम सुरु असतानाच कार्यकर्ते म्हणाले ‘टरबूज’; एकनाथ खडसे म्हणाले…

गोंयकारांसाठी राष्ट्रवादीचा खास असा गोवा विकास प्लॅन!

मोदींच्या विधानाच्या निषेधार्थ काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस उतरले रस्त्यावर

'Hamara Bajaj'! Rahul Bajaj a lighthouse for young entrepreneurs: NCP chief Sharad Pawar

“बहुमतापेक्षाही कितीतरी अधिक आमदार महाविकास आघाडीकडे आहेत. सरकार पाडायचा विचार केला व दुर्दैवाने सरकार पाडलं तरी बहुमताच्या जोरावर परत हेच सरकार येणार आहे,” असा विश्वासही एकनाथ खडसेंनी व्यक्त केला. “सरकार पडायला ठोस कारण असला पाहिजे. विरोधक मनाचे मांडे खात असून जोपर्यंत तिन्ही पक्षाचे बहुमत आहे तोपर्यंत हे सरकार पडू शकत नाही,” असं खडसेंनी म्हटलंय. 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी