35 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
Homeराजकीयसंभाजीराजेंनी सरकारच्या विरोधात आमरण उपोषण करण्याची घेतली भूमिका

संभाजीराजेंनी सरकारच्या विरोधात आमरण उपोषण करण्याची घेतली भूमिका

टीम लय भारी

मुंबई: महाराष्ट्र सरकारनं मागण्या त्वरित मान्य न केल्यास 26 फेब्रुवारीपासून आमरण उपोषण करण्याचा इशारा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दिला आहे.26 तारखेपासून पूर्णपणे अन्नत्याग करणार, असंही त्यांनी म्हटलं आहे.(Sambhaji Raje took a stand against state government)

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर संभाजीराजे यांनी आज पत्रकार परिषदेत ही भूमिका जाहीर केली आहे.राज्य सरकारच्या काही मुद्द्यांच्या विरोधात मी भूमिका घेण्याचा निर्णय घेतला, असं संभाजीराजेंना जाहीर केलं आहे.

मराठा आरक्षणाअंतर्गत निवड झालेल्या तरुणांना नियुक्त्या द्यायला काय हरकत आहे ? असाही सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. राज्य सरकारनं वरील मुद्दे त्वरित सोडवले नाहीत तर 26 फेब्रुवारीपासून आझाद मैदान येथे मी  एकट्याने आमरण उपोषण, पूर्णपणे अन्नत्याग करणार असल्याचा इशारा  संभाजीराजेंनी दिला आहे. सरकारनं वरील मागण्या मान्य कराव्या ही सरकारला विनंती आहे, असंही त्यांनी म्हटलंय.

हे सुद्धा वाचा

छत्रपती संभाजीराजे भोसले रायगडावरील ‘मदार मोर्चा’वरुन संतापले; म्हणाले…

मराठा आरक्षणाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भूमिका घ्यावी, श्रीमंत शाहू छत्रपतींचे वक्तव्य

Sambhaji Raje : महामंडळ बरखास्त करण्याचे टायमिंग चुकले : संभाजीराजे

Sambhaji Raje says will lead Maratha stir from June 16

वसतीगृहांच्या मुद्द्याकडेही दुर्लक्ष आहे. केवळ आश्वासनं दिली आहेत. अनेक वसतीगृहांचे प्रस्ताव आहेत पण ते प्रलंबित आहेत. अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाच्या बाबतीत सरकार रक्कम देत नाही. कर्ज परतावे काढत नसल्यानं बँका यापुढं कर्ज मंजूर करणार नाहीत. कोपर्डीच्या खटल्याचा निकाल लागून अनेक वर्ष झाली  त्यावर पुढील कारवाई कधी होणार ? आत्महत्या करणाऱ्यांच्या कुटुंबीयांना नोकरीची मागणी प्रलंबितच आहे. सारथी संस्थेचा मुद्दा महत्त्वाचा आहे, सारथीसाठी सरकार काय तरतूद करत आहे ते आम्हाला सांगावे, असे ते म्हणाले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी