29 C
Mumbai
Sunday, May 5, 2024
Homeटॉप न्यूजधनगर समाजाच्या ‘या’ मागणीसाठी सुप्रिया सुळे पुढाकार घेणार

धनगर समाजाच्या ‘या’ मागणीसाठी सुप्रिया सुळे पुढाकार घेणार

टीम लय भारी

मुंबई : सोलापूर विद्यापीठाच्या प्रांगणात अहिल्यादेवी होळकर यांचा भव्य पुतळा उभारण्यात यावा, अशी धनगर व बहुजन समाजाची इच्छा आहे. त्या अनुषंगाने खासदार सुप्रिया सुळे पाठपुरावा करणार आहेत ( Supriya Sule will take initiative to built statue of Ahilya devi Holkar ).

राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर यांनी नुकतीच खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेतली ( Sakshana Salgar meets to Supriya Sule ). सलगर यांनी सुप्रियाताईंना एक निवेदनही दिले. अहिल्यादेवी यांच्या उत्तुंग अशा कर्तृत्वाला साजेसा पुतळा उभारण्यात यावा, अशी मागणी सलगर या निवेदनाद्वारे केली.

सुप्रिया सुळे यांनी या मागणीची दखल घेतली आहे, व पुतळा उभारण्यासाठी सरकारकडून आवश्यक ते सहाय्य मिळविण्यासाठी पुढाकार घेण्याचे आश्वासन दिले असल्याचे सलगर यांनी ‘लय भारी’ला सांगितले.

हे सुद्धा वाचा

माजी मंत्री महादेव जानकर शेतात तण काढताहेत, औत चालवताहेत, अन् रोपेही लावताहेत

सुप्रिया सुळे, डॉ. अमोल कोल्हेंच्या पत्राला अनिल देशमुखांनी दाखविली केराची टोपली

Supriya Sule : सुप्रिया सुळेंचा निरोप आला, अन् IAS शेखर चन्ने यांनी अडचणीत असलेल्या 9 जणांना घरी पोचविले

Supriya Sule : सुप्रिया सुळेंची माणूसकी, लॉकडाऊनमुळे ताटातूट झालेल्या माय लेकराची घालून दिली भेट

Covid19 : सुप्रिया सुळेंना लोक विचारताहेत, राजेश टोपे डॉक्टर आहेत का ?

Supriya Sule will take initiative for Ahilyadevi Holkar statue
खासदार सुप्रिया सुळे यांना सक्षणा सलगर यांनी निवदेन दिले

अहिल्यादेवींचे कार्य

अहिल्यादेवी होळकर यांनी हिमालयापासून ते कन्याकुमारीपर्यंत अनेक ठिकाणी तलाव, पूल, विहिरी, धर्मशाळा बांधल्या. भारतातील तिर्थ क्षेत्रांचा विकास केला. तिर्थ क्षेत्रांना देणग्या दिल्या ( Ahilya Devi holkar was great leader ).

इंदूर संस्थानांतर्गत माळवा राज्य सुखी व समृध्द केले. या संस्थानातील भिल्ल, गौंड लोकांना शेतकरी बनविले. विधवा महिलांना संपत्तीत वाटा मिळावा तसेच मुल नसेल तर दत्तक घेता येते यावे यासाठी त्यांनी कायद्यात तरतुदी केल्या. अठराव्या शतकातच त्यांनी महिला सक्षमीकरणाची मुहूर्तमेढ रोवली ( Ahilya devi Holkar’s social work ).

अहिल्यादेवी होळकर मुसद्दी राजकारणीही होत्या. सन 1772 मध्ये त्यांनी पेशव्यांना इग्रंजापासून सावधगिरीचा इशारा दिला होता. अहिल्यादेवींचे कार्य पुढच्या पिढीपर्यंत पोचावे म्हणून सोलापूर विद्यापीठाच्या प्रांगणात पुतळा उभारण्यात यावा अशी मागणी सक्षणा सलगर यांनी केली आहे ( Ahilya devi Holkar’s statue will be built at Solapur University ).

ताज्या बातम्यांसाठी आमचे ट्विटर अकाऊंट फॉलो करा

lay bhari
येथे क्लिक करा, व फेसबुक पेज लाईक करा

Mahavikas Aghadi

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी