30 C
Mumbai
Thursday, May 9, 2024
Homeराजकीयइंधनदर वाढीच्या विरोधात काँग्रेसकडून मोदी सरकारचा जाहीर निषेध

इंधनदर वाढीच्या विरोधात काँग्रेसकडून मोदी सरकारचा जाहीर निषेध

टीम लय भारी

मुंबई :- मोदी सरकारच्या काळात सातत्याने होणाऱ्या दरवाढीमुळे सामान्य जनेतला अतिशय त्रास सहन करावा लागत आहेत. इंधन दरवाढीविरोधात महाराष्ट्र काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला आहे. ही दरवाढ रद्द करण्याच्या मागणीसाठी काँग्रेसचे स्थानिक नेते आणि कार्यकर्ते बैलगाडी आणि सायकलवरून तहसील कार्यालयात दाखल झाले. यावेळी दरवाढीच्या जाहीर निषेध करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे. तसेच काँग्रेसच्या वतीने मोठे आंदोलन छेडण्याचा इशारा मोदी सरकारला देण्यात आला आहे (Public protest of Modi government from Congress).

या सततच्या वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांचा खिशाला कात्री लागली आहे. या मोदी सरकारला सर्वसामान्यांची काहीही काळजी नाही आहे. केंद्र सरकारने लादलेल्या पेट्रोल-डिझेल दरवाढीचा आज गंगाखेड येथे काँग्रेसकडून जोरदार निषेध नोंदवण्यात आला.

काय आहे पेगासस स्पायवेयर आणि ते कसे काम करते?

मुंबईत पावसाने घातले थैमान; लोकांचे जनजीवन विस्कळीत

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती कमी झालेल्या आहेत. असे असतानाही केंद्र सरकार इंधनावरील अधिभार कमी करायला तयार नाही. ही सर्वसामान्य नागरिकांची लूट असून सामान्यांच्या खिशावरील दरोडाच असल्याची खरमरीत टिका यावेळी करण्यात आली. ही दरवाढ तात्काळ न रोखल्यास आगामी काळात कॉंग्रेसच्या वतीने मोठे आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी सभापती बाळकाका चौधरी, जिल्हा ऊपाध्यक्ष ॲड. संतोष मुंडे, संयोजक आणि तालुकाध्यक्ष गोविंद यादव, शहराध्यक्ष शेख युनूस, न. प. सदस्य नितीन चौधरी, महिला प्रदेश सदस्या शुभांगी शिसोदिया, युवक जिल्हाध्यक्ष प्रणित खजे, महिला तालुकाध्यक्षा जयश्री पछाडे, अल्पसंख्यक सेलचे मराठवाडा ऊपाध्यक्ष मुशरफ खान, सेवा दलाचे तालुकाध्यक्ष रोहिदास घोबाळे, युवकचे सरचिटणीस, माजी सरपंच सिद्धार्थ भालेराव, यांच्यासह पदाअधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Public protest of Modi government from Congress
पंतप्रधान नरेंद्र मोदी

पहिल्या वनडेत भारताचा 7 गडी राखत श्रीलंकेवर दणदणीत विजय…

“Modi Government Listening To Bedroom Conversations”: Congress On Pegasus

बैलगाड्या आणि सायकलवरून स्थानिक नेते मंडळी तहसील कार्यालयात दाखल झाले. बैलगाड्या आणि सायकलींच्या पुढे हलगी आणि पिपाणीचे पारंपरिक वादक सहभागी करण्यात आले होते. हलगीच्या कडकडाटासह पिपाणीचा सूर शहरवासीयांचे लक्ष वेधून घेतले आहे.

मोदी सरकारने झोपेचे सोंग घेतले आहे

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने झोपेचे सोंग घेतले आहे. त्यामुळे सामान्य जनता त्रस्त झालीय. या सरकारला जागे करण्यासाठी काँग्रेस पक्ष राज्यात सत्तेत असला तरी केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे काँग्रेस नेते अशोक चव्हाण म्हणाले आहेत. युपीए सरकारच्या कार्यकाळात 1-2 रुपयांची जरी पेट्रोल-डिझेल दरवाढ झाली तर विरोधी पक्ष म्हणून भाजप मोठ्या प्रमाणात टीका करत होते. त्यांनी त्यासाठी लोकसभा आणि राज्यसभेतही मोठा गोंधळ घातला होता. आता मात्र, पेट्रोलचे दर 100 रुपयांच्या वर गेले आहेत. तर डिझेलचे दरही वाढले आहेत. असे असूनही केंद्र सरकार झोपेचे सोंग घेत असल्याचा आरोप चव्हाण यांनी केला आहे (Chavan has accused the central government of pretending to be asleep).

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी