29.4 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
Homeराजकीयसोशल मीडियावर निर्बंध, लोकांना तुरुंगात टाकण्याचा केंद्राचा डाव; थेट मोदींवर आरोप...

सोशल मीडियावर निर्बंध, लोकांना तुरुंगात टाकण्याचा केंद्राचा डाव; थेट मोदींवर आरोप…

टीम लय भारी

मुंबई :- काही दिवसापासून फेसबुक, ट्विटर व व्हॉट्सअॅपसारख्या सोशल माध्यमांवर बंदी घालण्याची चर्चा सध्या देशात सुरू आहे. व्हॉटसॲप प्रायव्हसीच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी कॉंग्रेसने केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. सोशल मीडियावर निर्बंध, लोकांना तुरुंगात टाकण्याचा केंद्राचा डाव आहे असा थेट मोदींवर आरोप राष्ट्रवादीने केला आहे (The NCP has directly accused Modi of restricting social media and imprisoning people).

व्हॉटसॲपच्या आधारावर लोकांवर गुन्हे दाखल व्हावेत आणि त्या आधारावर त्यांना शिक्षा व्हावी. लोकांची खाजगी माहिती गोळा करता यावी. हे सगळे गंभीर आणि खतरनाक आहे. सोशल मीडियावर (social media) निर्बंध आणि त्याआधारावर लोकांना तुरुंगात टाकण्यासाठीच केंद्र सरकारचा (Central Government) हा सारा खेळ सुरू आहे, असा आरोप राष्ट्रवादीने केला आहे.

आरक्षाणाचा निर्णय मोदींनी घ्यावा, त्यांच्या हातात हुकूमाची पाने आहेत ; संजय राऊत

सोशल मिडियावर बंदी घातली तर भक्तमंडळ आनंदसोहळा कसे साजरा करणार?; शिवसेनेचा टोला

Social media companies need to be regulated – but BJP’s moves are aimed at controlling the narrative

राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी ही टीका केली आहे. आज भाजप केंद्रात सत्तेत आहे. या सोशल मीडियाच्या (social media) माध्यमातूनच भाजप सत्तेवर आली आहे. आता त्याच सोशल मीडियावर (social media) भाजप आज अंकुश लावण्याचा प्रयत्न करत आहे, अशी टीका मलिक यांनी केली.

केंद्राविरोधातील वातावरणामुळे…

सोशल मीडियाच्या (social media) माध्यमातून देशातील जनता केंद्र सरकारच्या (Central Government) विरोधात बोलत आहे. आपले म्हणणे प्रखरतेने मांडताना दिसत आहे. सोशल मीडियाच्या (social media) माध्यमातून विरोधात वातावरण निर्माण होत असल्याचे लक्षात आल्यावर त्याला अंकुश लावण्याचा आणि लोकांच्या खासगी आयुष्यात घुसण्याचा प्रयत्न केंद्रातील भाजप सरकार करत आहे, असा आरोप मलिक यांनी केला.

भाजपच्या कुटील डावाला विरोध

आज व्हॉटस्ॲप चॅटच्या आधारावर गुन्हे दाखल केले जात आहेत. परंतु न्यायालय व्हॉटस्ॲप चॅट कायदेशीर पुरावा मानत नाही. परंतु, केंद्रातील भाजप सरकार व्हॉटस्ॲप चॅटच्या आधारावर गुन्हे दाखल व्हावेत. त्याआधारे लोकांना शिक्षा व्हावी या प्रयत्नात आहेत. दरम्यान भाजपच्या या कुटील डावाचा आणि लोकांच्या खासगी आयुष्यात घुसण्याच्या कार्यक्रमाला आमचा तीव्र विरोध आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी