33 C
Mumbai
Friday, April 26, 2024
Homeक्रिकेटटी-20 संघाचा नवा कॅप्टन रोहित शर्मा, तर कसोटीतही रोहित व्हाईस कॅप्टन

टी-20 संघाचा नवा कॅप्टन रोहित शर्मा, तर कसोटीतही रोहित व्हाईस कॅप्टन

टीम लय भारी

मुंबई : बीसीसीआयने टीम इंडियाच्या नव्या टी-20 आणि वनडे टीमच्या कॅप्टनची घोषणा केली आहे. विराट कोहलीचा कामाचा ताण कमी करण्यासाठी वनडे आणि टी-20 संघाचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय विराट कोहलीने घेतला होता(Rohit Sharma: New captain of T20 team Rohit also vice-captain in Tests )

त्यानंतर टीम डंडियाचा टी-20 आणि वनडेत नवा कर्णधार कोण असणार यांची उत्सुक्ता सर्वांना लागली होती, ती प्रतीक्षा आता संपली आहे, कारण बीसीसीआयने नवा कर्णधार जाहीर केला आहे.

IND vs NZ : भारतानं न्यूझीलंडला हरवत जिकलं ‘मोठं’ बक्षीस

“पावसकर विरुध्द मुंबई कसोटी सामना”

टी-20 वनडे टीमचा कॅप्टन रोहित शर्मा

भारतीय टीमच्या टी-20 आणि वनडे टीमची धुरा आता हिटमॅन रोहित शर्मा याच्याकडे असणार आहे. बीसीसीआयने अधिकृतरित्या नव्या कॅप्टनची घोषणा केली आहे. तर रोहितकडे कसोटी क्रिकेटच्या संघाचं उपकर्णधारपदही देण्यात आले आहे. त्यामुळे संघ एका नव्या नेतृत्वात इथून पुढील वाटचाल करणार आहे.

नवा कोच, नवा कॅप्टन

टीम इंडियाचा अलिकडेच कोचही बदलला आहे. रवी शास्त्री पायउतार होऊन संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी राहुल द्रवीड (द वॉल) ची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यापाठोपाठ आता टीम इंडियाच्या वनडे आणि टी-20 संघाचा नवा कर्णधारही जाहीर करण्यात आला आहे.

“भारत न्युझीलंड कानपूर कसोटी क्रिकेट अध्याय” (भाग २)

When Virat Kohli predicted Rohit Sharma as a future India captain for first time

रोहितची सातत्यपूर्ण चमकदार कामगिरी

रोहित शर्मा गेल्या काही दिवसांपासून अत्यंत चमकदार कामगिरी करत आहे. रोहितला सध्याच्या घडीचा सर्वात बेस्ट आणि स्फोटक ओपनर मानले जाते, त्याच्या नावावर अनेक उतुंग रेकॉर्ड आहेत. वनडे क्रिकेटमध्ये तीन डबल सेंच्युरी मारणारा तो एकमेव खेळाडू आहे. तर एका विश्वकप स्पेर्धेत 5 शतके ठोकणाराही तो जगात एकमेव खेळाडू आहे. अलिकडेच त्याची कसोटी क्रिकेटमधील कामगिरीही सुधारली आहे.

ट्रॉफी जिंकून देणारा कर्णधार

विराट कोहलीच्या नावावर अनेक चांगले विक्रम आहेत. मात्र आयसीसी इव्हेंटमध्ये त्याची कामगिरी म्हणावी अशी झाली नाही. मात्र रोहित शर्माच्या नेतृत्वात जिथे टीम गेली तिथे ट्रॉफी जिंकून आली आहे. शिवाय रोहितच्या नावावर आयपीएलमध्ये पाच ट्रॉफी जिंकण्याचा विक्रमही आहे. त्यामुळे रोहित शर्माच्या गळ्यात कर्णधार पदाची माळ पडली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी