30 C
Mumbai
Friday, April 26, 2024
Homeक्रीडाAsia Cup 2022: जाणून घ्या कसे भारत आणि पाकिस्तानचे संघ एकदा नाहीतर...

Asia Cup 2022: जाणून घ्या कसे भारत आणि पाकिस्तानचे संघ एकदा नाहीतर दोनवेळा स्पर्धेत एकमेकांशी भिडू शकतात

भारत (India) आणि पाकिस्तानच्या (Pakistan) क्रिकेट सामन्याची प्रत्येक क्रिकेट रसिक नेहमीच आतुरतेने वाट पाहत असतो. त्यांच्यासाठी चांगली बातमी अशी आहे की, भारतीय संघ एकदा नाहीतर दोन वेळा पाकिस्तानच्या संघाशी दोन हात करू शकतो. पण त्यासाठी काही समीकरणे जुळून येणे महत्त्वाचे आहे. आपण हया लेखात हे जाणून घेऊयात की कशा प्रकारे ती संभावना सत्यात उतरू शकते.

भारत (India) आणि पाकिस्तानच्या (Pakistan) क्रिकेट सामन्याची प्रत्येक क्रिकेट रसिक नेहमीच आतुरतेने वाट पाहत असतो. त्यांच्यासाठी चांगली बातमी अशी आहे की, भारतीय संघ एकदा नाहीतर दोन वेळा पाकिस्तानच्या संघाशी दोन हात करू शकतो. पण त्यासाठी काही समीकरणे जुळून येणे महत्त्वाचे आहे. आपण हया लेखात हे जाणून घेऊयात की कशा प्रकारे ती संभावना सत्यात उतरू शकते.सध्या सुरू असलेल्या आशिया कप ( Asia Cup) क्रिकेट स्पर्धेच्या साखळी सामन्यात भारतीय संघाने अटीतटीच्या लढतीत पाकिस्तानचा पराभव केला. हार्दिक पंडयाच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर ते शक्य झाले. भारतीय क्रिकेट रसिकांनी या विजयानंतर जल्लोष केला. तर पाकिस्तान संघाच्या समर्थकांच्या पदरी मात्र निराशाच पडली.

आशिया कप स्पर्धा ही ‘अ’ आणि ‘ब’ अशा दोन गटात विभागली गेली आहे. ‘अ’ गटामध्ये भारतीय संघाने पाकिस्तान आणि हाँगकाँगच्या संघाला नमवून अंतिम चार संघात आपले स्थान निश्चित केले आहे. तर ‘ब’ गटामध्ये श्रीलंका आणि अफगाणिस्तानच्या संघानी अंतिम चार संघात आपले स्थान पक्के केले आहे.

पाकिस्तानच्या संघाचा आज हाँगकाँगशी सामना आहे. हया सामन्याच्या विजेत्या संघाची रविवारी भारताशी लढत होईल. जर पाकिस्तानने आजच्या सामन्यामध्ये हाँगकाँगला नमवले तर आशिया कप स्पर्धेत रविवारी दुसऱ्यांदा पाकिस्तान आणि भारतीय संघ एकमेकांशी भिडतील.

ganpati bappa contest

हे सुद्धा वाचा

Asia Cup : भारत-हाँगकाँग आशिया कपमध्ये हार्दिक पंड्याच्या जागी ऋषभ पंतची एन्ट्री

Eknath Shinde : एकनाथ शिंदे गोरगरीबांचे कैवारी वाटतात का ? जाणून घ्या सामान्य लोकांच्या इरसाल प्रतिक्रिया

Nana Patole : हिंदुत्त्वाचा डंका मिरवणाऱ्या इव्हेंटबाज सरकारनेच हिंदू शेतकऱ्यांना सोडले वाऱ्यावर- नाना पटोले

अंतिम चार साखळीत प्रत्येक संघ बाकीच्या तीन संघाशी प्रत्येकी एक सामना खेळेल. जर त्या साखळी फेरीत भारत आणि पाकिस्तानच्या संघाने प्रथम दोन स्थानावर आपली जागा निश्चित केली तर ११ सप्टेंबरला होणाऱ्या अंतिम सामन्यात ते एकमेकांशी स्पर्धेत तिसऱ्यांदा समोरासमोर येण्याची दाट शक्यता आहे. जर असे झाले तर क्रिकेट रसिकांना ती एक वेगळीच पर्वणी असेल.

हया सर्व समीकरणांपासून वेगळा विचार केला तर भारत, पाकिस्तान आणि श्रीलंकेच्या संघाला अफगानिस्तानच्या संघाशी सावध राहण्याची गरज आहे कारण ते स्पर्धेत ‘जांयट किलर’ ठरू शकतात. कारण साखळी सामन्यामध्ये अफगानिस्तानच्या संघाने श्रीलंकेच्या संघाचा ८ गडी राखून आणि बांग्लादेशच्या संघाचा ७ गडी राखून विजय संपादन करून सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी