31 C
Mumbai
Thursday, May 23, 2024
Homeक्रीडाIPL 2024: यजुर्वेंद्र चहलने जिंकली पर्पल कॅप, ऑरेंज कॅपवर 'हा' स्टार खेळाडू कायम 

IPL 2024: यजुर्वेंद्र चहलने जिंकली पर्पल कॅप, ऑरेंज कॅपवर ‘हा’ स्टार खेळाडू कायम 

IPL 2024 मध्ये राजस्थान रॉयल्स चांगल्या फॉर्म मध्ये दिसत आहे. राजस्थानच्या संघाने शनिवारी मोहाली येथे खेळण्यात आलेल्या सामन्यात पंजाब किंग्सचा पराभव केला. 148 धावांचा पाठलाग करताना राजस्थानने शिमरॉन हेटमायरच्या 10 चेंडूत 27 धावांच्या नाबाद खेळीच्या बळावर 19.5 षटकांत 152 धावा करून सामना जिंकला. (ipl 2024 orange cap purple cap list yuzvendra chahal captures the purple cap)

IPL 2024: ‘पुढच्या वर्षी रोहित चेन्नईकडून खेळणार’, इंग्लंडच्या ‘या’ माजी कर्णधाराचा मोठा दावा

हेटमायर व्यतिरिक्त राजस्थानकडून सलामीवीर यशस्वी जयस्वालने 28 चेंडूत 39 धावा केल्या, तर रायन परागने 18 चेंडूत 23 धावा केल्या. पंजाबकडून कागिसो रबाडा आणि सॅम कुरन यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. सामन्याच्या सुरुवातीला, आशुतोष शर्माच्या 16 चेंडूत 31 धावांच्या खेळीमुळे PBKS संघाने 20 षटकांत 147/8 अशी मजल मारली. यादरम्यान राजस्थानकडून केशव महाराज आणि ट्रेंट बोल्टने प्रत्येकी दोन बळी घेतले. (ipl 2024 orange cap purple cap list yuzvendra chahal captures the purple cap)

T20 WC 2024 मध्ये विराट आणि केएल राहुल शिवाय खेळणार टीम इंडिया! माजी क्रिकेटपटूचे मोठे विधान

IPL 2024: यजुर्वेंद्र चहलने जिंकली पर्पल कॅप, ऑरेंज कॅपवर 'हा' स्टार खेळाडू कायम 
या सामन्यानंतर ऑरेंज कॅप  आणि पर्पल  कॅपच्या यादीत बराच फरक पडला आहे. आरसीबी स्टार विराट कोहली सहा सामन्यांत 319 धावांसह ऑरेंज कॅपच्या शर्यतीत अव्वल स्थानावर आहे. त्याच्यानंतर राजस्थानचा रियान पराग (284) दुसऱ्या स्थानावर आहे.  संजू सॅमसन 264 धावांसह चौथ्या स्थानावरून तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिल 255 धावांसह चौथ्या आणि साई सुदर्शन (226) पाचव्या स्थानावर आहे. (ipl 2024 orange cap purple cap list yuzvendra chahal captures the purple cap)

IPL 2024: रोहित शर्माने केला मोठा खुलासा, सांगितले कधी घेणार संन्यास

IPL 2024: यजुर्वेंद्र चहलने जिंकली पर्पल कॅप, ऑरेंज कॅपवर 'हा' स्टार खेळाडू कायम 

राजस्थानच्या विजयासह, यजुर्वेंद्र चहलने जसप्रीत बुमराहला मागे टाकून IPL 2024 पर्पल कॅपच्या शर्यतीत अव्वल स्थान पटकावले. चहलच्या नावावर आता सहा सामन्यात 11 विकेट्स आणि बुमराहच्या नावावर पाच सामन्यात 10 विकेट्स आहेत. रबाडा 9 विकेट सह तिसऱ्या स्थानावर आहे, सीएसकेचा मुस्तफिजुर रहमान (9) चौथ्या आणि दिल्लीचा गोलंदाज खलील अहमद (9) पाचव्या स्थानावर आहे. (ipl 2024 orange cap purple cap list yuzvendra chahal captures the purple cap)

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी