29 C
Mumbai
Wednesday, May 1, 2024
Homeटॉप न्यूजशाश्वतता, सर्वसमावेशक विकास आणि डॉ. बी. आर. आंबेडकर’ या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषद

शाश्वतता, सर्वसमावेशक विकास आणि डॉ. बी. आर. आंबेडकर’ या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषद

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथे १९२३ ला सादर केलेल्या ‘द प्रॉब्लेम ऑफ रूपीः इट्स ओरिजीन अँड इट्स सोल्युशन’ या पीएचडी प्रबंधाच्या शताब्दी सोहळ्यानिमित्त लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था (बार्टी) आणि मुंबई विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आज ( १३ एप्रिल) लंडन येथे ‘शाश्वतता, सर्वसमावेशक विकास (Sustainability inclusive development) आणि डॉ. बी. आर. आंबेडकर’((Dr. B. R. Ambedkar ) या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेचे ( International Conference) उदघाटन मान्यवरांच्या हस्ते झाले. यावेळी अध्यक्ष आणि कुलगुरू लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स लॅरी क्रामेर, लॉर्ड निकोलस स्टर्न, प्रोफेसर ऑफ इकॉनॉमिक्स अँड गव्हर्नमेंट अँड को-चेअर इंडिया आयजी पटेल , को-चेअर इंडिया ऑब्झर्वेटरी, डॉ. रुथ कुट्टुमुरी, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी, कुलसचिव प्रा. बळीराम गायकवाड, बार्टी महासंचालक श्री. सुनील वारे (Sustainability, inclusive development and dr. B. R. International Conference on ‘Ambedkar’)

लंडन स्थित अभ्यासक आणि अनिवासी भारतीय श्री. गंगावणे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्राच्या संचालिका डॉ. मनिषा करणे, सुजीत घोष, उपउच्चआयुक्त, भारतीय उच्चआयुक्तालय, डॉ. शंतनू सिंह, संशोधक, इंडिया ऑब्जर्वेटरी, डॉ. सुप्रिया कामथ, डॉ. नियथी कृष्णा, श्रीमती एलिजाबेथ रायन आणि मानस गोयल यांच्यासह विविध मान्यवर आणि लंडन आणि भारतातून ६४ संशोधक उपस्थित होते.

मलेशिया सभागृह, सेंटर बिल्डिंग लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स, लंडन येथे हा उदघाटन सोहळा झाला. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांच्या विशेष पुढाकारातून या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. ही परिषद डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त व त्यांच्या प्रबंधाच्या शताब्दी सोहळ्याचे औचित्य साधून लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्स येथे आयोजित व्हावी यासाठी ते मागील वर्षभरांपासून ते प्रयत्नशील असल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले.
१३ आणि १४ एप्रिल २०२४ या दरम्यान आयोजित केलेल्या या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये ‘शाश्वतता, सर्वसमावेशक विकास आणि डॉ. बी. आर. आंबेडकर’ या विषयाच्या अनुषंगाने देश-विदेशातील अनेक संशोधक, प्राध्यापक आणि मान्यवर सादरीकरण करणार आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विविध क्षेत्रातील महत्वपूर्ण योगदान, प्रघाड ज्ञान आणि समकालीन संशोधन आणि आर्थिक धोरणांशी त्यांची प्रासंगिकता यावर संशोधक आणि धोरणकर्त्यांना या परिषदेच्या माध्यमातून ज्ञान मिळण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

या परिषदेमध्ये ‘आंबेडकर्स कॉन्ट्रीब्युशन्स टू इंडियन इकॉनॉमिक रिफॉर्म’, ‘कास्ट अँड सोशल जस्टीस’, ‘इंटरसेक्शनल इनइक्वॅलीटीज्’, ‘आंबेडकर्स व्हिजन ऑन एज्युकेशन, लिटरेचर अँड कल्चर’ अशा चार सत्रात विविध संशोधक त्यांच्या विषयांचे सादरीकरण करतील. समारोपीय सत्रासाठी माल्दोवाच्या माजी पंतप्रधान नतालिया गॅव्रिलिटा, लॉर्ड मेघनाथ देसाई, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी, कुलसचिव प्रा. बळीराम गायकवाड, बार्टीचे महासंचालक सुनिल वारे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुरेश गोसावी, इंडो ब्रिटीश ऑल पार्टी पार्लिमेंटरी ग्रुप चेअरचे विरेंद्र शर्मा यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
मुंबई विद्यापीठाच्या वतीने सहभागी झालेले शिष्टमंडळ हे कँब्रिज विद्यापीठ (ट्रीनिटी कॉलेज), लंडन विद्यापीठ, झोरास्ट्रीयन इन्स्टीट्यूट, युनिव्हर्सिटी ऑफ बर्मिंगहम, युनिव्हर्सिटी ऑफ रिडींग येथे शैक्षणिक सामंजस्य आणि सहकार्य संधीसाठी भेटी देणार असल्याचे मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांनी सांगितले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी