27.8 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
Homeक्रीडाआयपीएल खेळणारा नेपाळचा पहिला क्रिकेटपटू वादाच्या भोवऱ्यात, बलात्काराचा गंभीर आरोप

आयपीएल खेळणारा नेपाळचा पहिला क्रिकेटपटू वादाच्या भोवऱ्यात, बलात्काराचा गंभीर आरोप

क्रिकेट विश्वातून आता एक मोठी माहिती समोर येत आहे. नेपाळचा माजी कर्णधार संदीप लामिचाने (Sandeep Lamichhane) याच्या अडचणीमध्ये वाढ होऊ लागली आहे. भारताच्या २०२४ आयपीएलमध्ये तो खेळणार होता. मात्र आता तो वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. त्याच्यावर नेपाळ कोर्टावर बलात्काराचा आरोप लावल्याने तो आता संकटात सापडला आहे. नेपाळमधील न्यायालयाने संदीपला जानेवारी महिन्यामध्ये जामीन दिला असून ऑगस्ट महिन्यामध्ये त्याने एका १७ वर्षीय मुलीवर बलात्कार केला असल्याचं नेपाळ कोर्टानं सांगितलं आहे. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे. यामुळे क्रिकेटविश्वामध्ये एकच खळबळ उडाली आहे. (Sandeep Lamichhane rape case)

संदीप आयपीएल खेळणारा नेपाळचा पहिलाच खेळाडू होता. त्याने २०१८ साली दिल्ली कॅपिटल्स संघाकडून पदार्पण केलं आहे. काठमांडू पोस्टच्या रिपोर्टनुसार न्यायमुर्ती शिशिर राज ढकाल यांच्या एका सदस्यीय खंडपीठाने शुक्रवारी त्याला दोषी ठरवलं असून पुढील सुनावणामध्ये संदीपला शिक्षा सुनावली असल्यानं संदीपचं क्रिकेट करिअर आता धोक्यात आलं आहे. सध्या संदीप जामीनावर बाहेर असून १२ जानेवारी दिवशी पाटन उच्चन्यायालयाने त्याचा जामीन मंजुर केला आहे. यासाठी त्याला २० लाख रूपयांच्या जातमुचलक्यावर जामीन देण्यात आला.

हे ही वाचा

IAS अधिकाऱ्याचा एक एसएमएस, आणि देवेंद्र फडणविसांकडून शिवरायांच्या प्रकल्पासाठी ६०० कोटीचा निधी मंजूर, थर्टी फर्स्टची अनोखी कहाणी

ऋषभ पंतसाठी एका वर्षांआधी आजचा दिवस ठरला दैवबलवत्तर

‘आईच्या गावात मराठीत बोल’ या चित्रपटात थ्री इडियट्समधील चतुरचं पदार्पण

संदीपविषयी थोडक्यात 

संदीप हा नेपाळचा माजी कर्णधार आहे. तो फिरकी गोलंदाज आहे. त्याच्या गोलंदाजीमुळे तो टी२० मध्ये प्रसिद्धीस आला आहे. ऑस्ट्रेलियातील बिग बॅश लीग, पाकिस्तानमधील  सुपर लीग, कॅरेबियन प्रीमिअर लीगमध्ये तो खेळला आहे. त्याने अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. टी २० क्रिकेटमध्ये त्याने सर्वात वेगाने ५० विकेट्स घेण्यात तो तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक ५० विकेट्स घेण्यात तो दुसऱ्या क्रमांकावर आहे. अखेरचा टी २० सामना केनियाविरूद्ध खेळला होता. त्यावर जेव्हा बलात्काराचा आरोप झाला तेव्हा ६ ऑक्टोबर दिवशी त्याला त्रिभूवन आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अटक करण्यात आली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी