27 C
Mumbai
Thursday, September 19, 2024
Homeक्रीडाकौतुकास्पद ! आशियाई जिम्नॅस्टिक्समध्ये परिणाचा ज्युनियर गटात पाचव्या क्रमांकावर झेप

कौतुकास्पद ! आशियाई जिम्नॅस्टिक्समध्ये परिणाचा ज्युनियर गटात पाचव्या क्रमांकावर झेप

मनिला, फिलिपाइन्स येथे झालेल्या 19 व्या आशियाई ज्युनियर ऱ्हिदमिक जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत भारताच्या परिणा राहुल मदनपोत्रा ​​हिने आपले कौशल्य उल्लेखनीय कामगिरी केली आहे. जपान आणि कोरियासारख्या बलाढय़ प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून परिणाने भारताचा अटकेपार झेंडा रोवला आहे. तिच्या या कृतीमुळे सर्व स्तरावर तिचे कौतुक होत आहे. 31मे ते 3 जून या कालावधीत पार पडलेल्या स्पर्धेत परिणाने अप्रतिम कामगिरी केली. यामुळे तिने कनिष्ठ गटात पाचव्या क्रमांकावर झेप घेतली. तिच्यापुढे मलेशिया, कोरिया, जपानसारख्या बलाढ्य प्रतिस्पर्ध्यांचे आव्हान होते, तरीगही परिणाने 24.15 गुण मिळवून लोकांच्या नजरेत उत्तम स्थान मिळवले आहे. विशेष म्हणजे अंतिम फेरीसाठी पात्र ठरणारी परिणा ही भारतातील पहिली जिम्नॅस्ट ठरली आहे.

या स्पर्धेत भारताच्या आतापर्यंतच्या सर्वोत्तम कामगिरीबद्दल मुख्य प्रशिक्षक वर्षा उपाध्ये, प्रशिक्षक क्षिप्रा जोशी आणि सदिच्छा कुलकर्णी यांनी परिणाचे कौतुक केले आहे. लीलावती पोदार हायस्कूलमधील नववीत शिकणाऱ्या परिणाने 2014 पासून जिम्नॅस्टिक्सकडे आपले लक्ष वळवले होते. शिक्षण आणि खेळ यांचा मेळ साधत, परिणाने राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी केली. यात तिने अनेक पदके जिंकली. परिणाने गेल्या वर्षी थायलंडमध्ये झालेल्या 18व्या आशियाई ऱ्हिदमिक जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत चांगली कामगिरी केली होती, परंतु अंतिम फेरी गाठण्याचे तिचे स्वप्न अधुरे राहिले.

हे सुध्दा वाचा :

उडिसा रेल्वे अपघातानंतर रुळावर सापडली उत्कट प्रेम कवितांची वही

जबरा फॅन ! धोनीच्या चाहत्याने चक्क लग्नपत्रिकेवर छापला फोटो

सोनियासमोर नाक घासलं, आठवत नाही का ?, संजय राऊतांवर नरेश म्हस्के यांनी सोडला बाण !

याआधी पाच वर्षांपूर्वी म्हणजेच 2018 मध्ये, परिणा मदनपोत्रा ​​हिने हाँगकाँग येथे झालेल्या हाँगकाँग आंतरराष्ट्रीय ऱ्हिदमिक जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत दोन सुवर्णपदके जिंकली आहेत. परिणाने राष्ट्रीय तसेच राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये आपला दबदबा निर्माण केला आहे. गेल्या वर्षी ठाण्यात झालेल्या CICSE-राष्ट्रीय स्पर्धेत परिणाने पाच सुवर्ण आणि दोन रौप्य पदके जिंकली होती. त्याआधी, 2019 मध्ये झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत तिने दोन कांस्यपदके जिंकली होती. परीनाने 2019 च्या राज्य स्पर्धेत पाच सुवर्णपदके जिंकली होती.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी