28 C
Mumbai
Saturday, July 27, 2024
Homeराजकीय'वंशाचा दिवा मुलीच लावतात'

‘वंशाचा दिवा मुलीच लावतात’

राज्यात लोकसभा निवडणुकावरून नेत्यांमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. कोणी एक पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात प्रवेश करत आहे तर कोणी पक्ष फोडत सत्ता बळकवण्याचा प्रयत्न करत आहेत. काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकारण हे वेगळ्याच वळणावर गेलेलं पाहायला मिळत आहे. राजकारणातील वाद हा राजकीय पटलापर्यंत होता, मात्र आता तो घरगुती नात्यांपर्यंत पोहचू लागला आहे. राजकारणामुळे केवळ पक्ष तुटला नाही तर कुटुंबात फुट पडल्याच्या चर्चा आहेत. याबाबत कर्जत येथील शिबिरात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळेंचे नाव न घेता टीका केली आहे.

कर्जतच्या शिबिरात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अनेक नेते मंडळी उपस्थित होते. यावेळी आगामी लोकसभा निवडणुकांवर अधिक भाष्य केलं जात होतं. तर दुसरीकडे छगन भुजबळांनी मराठा समाज आणि शरद पवारांवर टीका केली आहे, अशातच अजित पवारांनी वंशाचा दिवा मुलांपेक्षा मुली लावतात असे वक्तव्य करत नाव न घेता शरद पवार आणि सुप्रिया सुळेंवर टीका केली आहे. अशातच ते म्हणाले की, दुसऱ्यांची मुलं पुढं जाताना द्वेश कशाला हवा आहे? असा सवाल केला आहे. या वक्तव्याने केवळ राजकारणातच नाही तर कौटुंबिक जीवनातही पवार कुटुंबात वादाची ठिणगी पेटल्याची चिन्हे जसजशी निवडणूक जवळ येईल तशी दिसू लागली आहे, अशा चर्चा आहेत.

हे ही वाचा

दत्ता दळवींना जामीन मंजूर तर काही अटी लागू

राज्यातील ‘या’ ठिकाणी अजित पवार गट जागा लढवणार

राष्ट्रवादीच्या पवार गटाचे अजितदादा, सुनील तटकरे यांना १० प्रश्न !

या शिबिरात अजित पवारांनी बारामती, रायगड, शिरूर आणि सातारा या ठिकाणी निवडणुकीसाठी जागा लढवणार असल्याचे सांगितले आहे. त्यापैकी बारामतीत सुप्रिया सुळे खासदार आहेत. तर शिरूरमध्ये अमोल कोल्हे खासदार आहेत. सातारा येथे श्रीनिवास पाटील खासदार आहेत. रायगडमध्ये सुनिल तटकरेंचं वर्चस्व असल्याने इतर तीन जागेंवर अजित पवार यावेळी लक्ष देणार असून लवकरच गृहमंत्री अमित शहांची भेट घेणार असल्याचं अजित पवार म्हणाले आहेत.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या जागा मिळण्यासाठी प्रयत्न करणार, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्याशी सविस्तर चर्चा करून पुढील निर्णय घेणार असल्याचे अजित पवार म्हणाले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी