27 C
Mumbai
Wednesday, February 14, 2024
Homeराजकीयराष्ट्रवादीच्या पवार गटाचे अजितदादा, सुनील तटकरे यांना १० प्रश्न !

राष्ट्रवादीच्या पवार गटाचे अजितदादा, सुनील तटकरे यांना १० प्रश्न !

राज्यातील राजकारण पाहता लोकशाहीचा अवमान होत असल्याचे मतदार राजाचे म्हणणं आहे. याचसह जे शिवसेना पक्षाचे झाले आता तेच राष्ट्रवादी पक्षाचं झालं आहे. केंद्रात भाजपची सत्ता असल्याने ईडी, सीबीआयचा वापर करत भाजप पक्ष फोडून सरकार स्थापन करत आहे. यामागे दिल्लीची अदृश्य शक्ती असल्याच्या चर्चा असल्याचं वारंवार बोललं जातंय. कारण ईडीचा सामना हा शरद पवारांनीही केला होता. त्याचपद्धतीने अजित पवारांनीही करणं अपेक्षित होतं. मात्र अजित पवार दिल्ली पुढं झुकले असल्याचं राष्ट्रवादी नेते विकास लवांडेंचं म्हणणं आहे. त्यांनी अजित पवार आणि सुनील तटकरेंना  १० प्रश्न विचारले आहेत.

१) अजित पवार भेकड आहेत. भेकट नसते तर त्यांनी स्वाभिमानाने स्वत:चा पक्ष काढला असता. ते दिल्लीसमोर झुकले, शरद पवार साहेब पक्षाचे संस्थापक असताना कोणाच्या आधारावर पक्षावर हक्क दाखवत आहात?. ईडीला पवार साहेबांनी देखील सामना केला आहे. आपण का ईडीला आव्हान दिले नाही? अटक होईल म्हणून घाबरलात की, तुम्ही सर्वजण घाबरट आहात?

२) प्रशासनावर वचक असता तर भ्रष्टाचार वाढला नसता, ते वाढण्याचे कारण काय तो कसा वाढला? जनतेचे जातीचे दाखले आणि इतर कामं प्रलंबित का आहेत? मराठा आरक्षणासाठी काय केलं? चार महिन्यात कोणते महत्वाचे काम केले आहे? मराठा आंदोलकांना पाठिंबा की भुजबळांना पाठिंबा? याबाबत कधी सांगाल?

३) स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांसाठी अजित पवार आधी अनेकदा बोलत होते, मात्र आता याबाबत ते कोणतेही वक्तव्य करत नसून ते आता गप्प का आहेत?

४) ४३ आमदारांचा पाठिंबा असल्याचे प्रतिज्ञापत्र दबावाखाली घेतले आहेत. याबाबतचा व्हिडीओ,फोटो जणतेसमोर का आणत नाहीत?

५) खोके सरकरमध्ये अजित पवार हे डीसीएम २ आहेत, याला प्रमोशन की डीमोशन म्हणायचं?

हे ही वाचा

मनोज जरांगेंच्या सभेचा चौथा टप्पा आजपासून

विराट कोहलीबाबत सचिन तेंडुलकरचं मोठं वक्तव्य

वंदे मातरम, जय हिंद शब्दांवर बंदी; सदस्यांसाठी नवे नियम

६) राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी घड्याळ तेच फक्त वेळ नवी असे वक्तव्य केलं, या वक्तव्यावर हा आत्मविश्वास कुठूण येतो?, असा सवाल लवांडेंनी केला आहे.

७) देशाच्या पंतप्रधानांनी भोपाळच्या ७० हजार कोटींच्या भ्रष्टाचाराबाबत वक्तव्य केलं होतं, याबाबत अधिकृत खुलासा कधी होईल? असा देखील सवाल लवांडेंनी केला आहे.

८) राष्ट्रवादी पक्षावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले होते ते कोणामुळे होत होते? पक्षाची बदनामी कोणामुळे होत होती?

९) पक्षाने एवढं मोठं केलं, निवडणुकांमध्ये मत कोणामुळं मिळाली? आपल्या हातात पक्ष असूनही पक्ष का वाढवता आला नाही? लहान मोठे ठेकेदार कोणी जपले?

१०) राजकीय पटलावर ज्यांनी मोठी ओळख शरद पवारांनी निर्माण करून दिली त्यांच्याबद्दल कृतज्ञता निर्माण करता आली नाही तरी चालेल मात्र कृतघ्नपणा का करता? असे जहरी प्रश्न विकास लवांडेंनी अजित पवार आणि सुनील तटकरेंना विचारले आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी