28 C
Mumbai
Saturday, July 27, 2024
Homeराजकीयदत्ता दळवींना जामीन मंजूर तर काही अटी लागू

दत्ता दळवींना जामीन मंजूर तर काही अटी लागू

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आणि मुंबईचे माजी महापौर दत्ता दळवी पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. शिवसेना संस्थापक बाळासाहेब ठाकरेंचा सच्चा कार्यकर्ता आणि शिवसैनिक म्हणून दत्ता दळवींची ओळख आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना शिवीगाळ केल्या प्रकरणी दत्ता दळवींना भांडुप पोलीस ठाण्यात 153 (A), 153 (B), 153(A) (1) सी,294, 504,505 (1) (C) कलमान्वये गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली होती. दत्ता दळवींची प्रकृती अस्थिर असल्याने त्यांना १५ हजार रूपयांच्या जातमुचलक्यावर जामीन देण्यात आला. आरोपी वयस्कर आणि आजारी असल्याने पळून जाणार नसल्याची बाब कोर्टाने लक्षात घेता, त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. एकनाथ शिंदेंवर केलेलं वक्तव्य दळवींना भोवलं आहे.

(२६ नोव्हेंबर) दिवशी उबाठा गटाचा विद्यार्थी मेळावा होता, यावेळी दत्ता दळवींनी एकनाथ शिंदेंवर खालच्या पातळीत भाष्य करत अवमान केला आहे. हे कृत्य दळवींना भोवले आहे. चौदा दिवसांच्या तुरूंगवासाची शिक्षा देण्यात आली, मात्र १५ हजार जातमुचलक्यावर दळवींना सोडवण्यात आलं आहे. दळवी हे वयोमानानुसार आजारी असतात, ही बाब लक्षात घेता न्यायालयाने दळवींना दिलासा दिला आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर दळवींनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली नाही.  मुख्यमंत्र्यांवर केलेल्या वक्तव्याने ते चर्चेत आले आहेत.

हे ही वाचा

राज्यातील ‘या’ ठिकाणी अजित पवार गट जागा लढवणार

राष्ट्रवादीच्या पवार गटाचे अजितदादा, सुनील तटकरे यांना १० प्रश्न !

मनोज जरांगेंच्या सभेचा चौथा टप्पा आजपासून

काय म्हणाले दत्ता दळवी?

दत्ता दळवी म्हणाले की, आता जर दिघे साहेब असते ना तर या एकनाथला चाबकाने फोडून काढले असते. एकनाथ शिंदे काय करत होता? काय होता? हे सर्व आम्ही बघितलेलं होतं. नाव बाळासाहेबांचं वापरायचे. आता ते हिंदुहृदयसम्राट वापरत आहेत. अरे ###डीच्या तुला हिंदुहृदयसम्राटाचा अर्थ तरी कळतो का?, असे म्हणत दत्ता दळवींनी एकनाथ शिंदेंवर प्रहार केला. मात्र हाच प्रहार दळवींच्या अंगलट आला. दरम्यान, दळवींना न्यायालयाने काही अटी दिल्या आहेत, त्या अटी दळवींना पाळाव्या लागणार आहेत.

काय आहेत अटी

प्रकरणाचा तपास लागेपर्यंत प्रतिबंध लागू होईल.

मुख्यमंत्र्यांबाबत कोणतंही अवमानकारक वक्तव्य करू नये.

प्रक्षोभक वक्तव्य करू नये

कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये

पोलिसांनी सहकार्य करणं बंधनकारक

कोण आहेत दत्ता दळवी?

शिवसेना मुंबईचे माजी महापौर हे दत्ता दळवी होते. बाळासाहेब ठाकरेंनी अनेक शिवसैनिक घडवले. त्यापैकी दत्ता दळवी आहेत. शिवराळ भाषा आणि शिवसैनिक हा एक दुवाच आहे. यापैकी दत्ता दळवी हे एक उदाहरण आहे. सुरूवातील विभागप्रमुख ७ च्या विभागप्रमुख पदी दत्ता दळवींची निवड झाली. त्यानंतर त्यांनी २००५ ते २००७ या कालावधीत मुंबईचे महापौर म्हणून काम केलं आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी