27 C
Mumbai
Saturday, July 27, 2024
Homeराजकीयराज्यातील 'या' ठिकाणी अजित पवार गट जागा लढवणार

राज्यातील ‘या’ ठिकाणी अजित पवार गट जागा लढवणार

राज्यात आगामी निवडणुकांचा विचार करता सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. शरद पवार गटाचे नेते आणि आमदार रोहित पवार आपल्या युवा यात्रेच्या माध्यमातून आपलं काम करत जनतेच्या मनात स्थान निर्माण करत आहे. तर दुसरीकडे बंड केलेले राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आगामी निवडणुकीच्या चार ठिकाणी जागा लढवणार असल्याचे कर्जतच्या शिबिरात सांगितलं आहे. यावरून आता राजकारणात ट्विस्ट घडताना दिसेल. बारामती,रायगड, शिरूर, सातारा या चार ठिकाणी राष्ट्रवादी (अजित पवार गट) पक्षाच्या जागा लढवणार आहेत. या ४ पैकी ३ ठिकाणी राष्ट्रवादी शरद पवार गटाचं पारडं जड असून या ठिकाणी अजित पवार गटाला आपले स्थान निर्माण करायचे असल्याच्या चर्चा आहेत.

बारामती मतदारसंघात राष्ट्रवादी हा बालेकिल्ला आहे. हा बालेकिल्ला भाजपला मिळवून देण्यासाठी अजित पवारांनी बारामतीची जागा निवडली आहे. कारण या ठिकाणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आहेत. यासाठी अजित पवारांनी बारामती जागा निवडली आहे. तर साताऱ्यात श्रीनिवास पाटील हे खासदार आहेत. शिरूरमध्ये अमोल कोल्हे खासदार आहेत. हे खासदार शरद पवार गटाचे असल्याने, भाजपला या जागांवर विजय मिळवून देण्यासाठी अजित पवार गट प्रयत्नात आहे. तर रायगडमध्ये अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरेंचं वर्चस्व आहे.

हे ही वाचा 

राष्ट्रवादीच्या पवार गटाचे अजितदादा, सुनील तटकरे यांना १० प्रश्न !

मनोज जरांगेंच्या सभेचा चौथा टप्पा आजपासून

जयंत पाटील युवा संघर्ष यात्रेला का गेले नाहीत?

लोकसभा निवडणुकांच्या चर्चेबाबत अजित पवार म्हणाले की, आमची सध्या प्राथमिक चर्चा सुरू आहे. अजूनही सविस्तर चर्चा झाली नाही. चंद्रकांत बावनकुळे, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांच्यासोबत एकदा चर्चा करणार आहोत. सध्या काही राज्यांच्या निवडणुका सुरू आहेत. त्या निवडणुका झाल्या की त्या त्या भागातील पक्षातील लोकांचं काम पाहू, इलेक्टीव्ह मिरीट पाहून चांद्यापासून बांध्यापर्यंत जाऊन लोकसभा निवडणुकीचे काम करायचे आहे, असे अजित पवार म्हणाले आहेत.

ज्या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेसाठी जागा वाटप करण्यात आल्या आहेत, त्या ठिकाणीही राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची ताकद दिसणार आहे. यासाठी शिंदेसाहेब आणि भाजपशी चर्चा करून जागा मिळवता येईल, असे अजित पवार म्हणाले आहेत, सध्या कर्जत येथे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शिबिर आहे, या शिबिरात अजित पवारांनी माहिती दिली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी