28 C
Mumbai
Saturday, July 27, 2024
Homeमहाराष्ट्र'तुम्ही पवार नसता तर बारामतीत निवडून आला असता का'?

‘तुम्ही पवार नसता तर बारामतीत निवडून आला असता का’?

आगामी लोकसभा निवडणुकांचे वारे आतापासूनच वाहू लागले आहे. यावेळी सर्वच पक्ष कंबर कसून काम करत आहेत. यंदाच्या लोकसभा निवडणुकीकडे अनेकांचे लक्ष लागले असून या निवडणुकीत रंगत निर्माण होणार आहे. मात्र या निवडणुकीपूर्वी अजित पवारांनी आपल्या ८ आमदारांसह भाजप आणि शिंदे गटासह हातमिळवणी केली असून शरद पवारांना एकटं सोडलं आहे. राजकारण म्हटलं की आरोप-प्रत्यारोप करणं हे काही नवीन नाही, मात्र या राजकारणाचा परिणाम हा राजकीय नेत्यांच्या नात्यांवर, कुटुंबांवर होतो, हे (१ डिसेंबर) कर्जत येथे अजित पवार गटाच्या शिबिरात पाहायला मिळालं आहे, अजित पवारांनी नाव न घेता सुप्रिया सुळे आणि शरद पवारांवर टीका केली आहे. यावर आता जितेंद्र आव्हाडांनी हळहळ व्यक्त केली आहे.

देशाचं आणि राज्याचं राजकारण हे वेगळ्याच पातळीवर गेलेलं पाहायला मिळत आहे. पक्ष फोडून, ईडीचा धाक दाखवून विविध राज्यांमध्ये सरकार स्थापन केलं जात आहे. मात्र आता राजकारणात नात्यानात्यांमध्ये राजकीय व्यासपीठावरून वक्तव्य केलं जात आहे. अजित पवारांनी सुप्रिया सुळेंचं आणि शरद पवारंचं नाव न घेता टीका करत म्हणाले, की वंशाचा दिवा फक्त मुलीच लावतात. या वक्तव्यावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाडांनी अजित पवारांच्या वक्तव्यावर संताप वक्त केला.

हे ही वाचा

‘वंशाचा दिवा मुलीच लावतात’

दत्ता दळवींना जामीन मंजूर तर काही अटी लागू

राज्यातील ‘या’ ठिकाणी अजित पवार गट जागा लढवणार

काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?

अजित पवारांनी वंशाच्या दिवा आणि पणती याबाबत वक्तव्य केलं असता, आव्हाड म्हणाले की, वंशाचा दिवा मुलं आणि मुली एवढ्या खालच्या पातळीवर तुम्ही घसरता आहो तुम्ही पवार नसता तर बारामतीतून निवडून आला असता? वंशाचा दिवा, मी त्या घराण्याचा नाही, हा काय माझा दोष आहे का? आहो तुमची पुण्याई आहे की तुम्ही त्यांच्याच घरात जन्माला आलात, आव्हाडांच्या घरात जन्माला आला असता तर तुम्हाला चार वेळा उपमुख्यमंत्री पद मिळालं नसतं. बंडखोरी केल्यानंतरही तुम्हाला पक्षात घेतलं नसतं, स्वत:च्या काकाच्या पाठीत खंजीर खुपसत असलेले नेते आमच्यावर आरोप करत आहेत.

अजित पवारांनी शरद पवारांवर बोलावं हे म्हणजे काय कलियुग आहे. बारामती मतदारसंघ निर्माण कोणी केला तर शरद पवारांनी तो तुम्हाला आयता हातात आणून दिला आहे. कमीत कमी एवढी तरी मर्यादा बाळगा की शरद पवारांवर बोलणार नाही. चांगले चांगले नेते आज मर्यादा बाळगून आहेत की, शरद पवारांवर बोलायचं नाही, असं बोलत आव्हाडांनी अजित पवारांना सुनावले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी