28 C
Mumbai
Saturday, July 6, 2024
Homeमहाराष्ट्रअजितदादांनी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणविसांचा वाजविला 'बँड' !

अजितदादांनी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणविसांचा वाजविला ‘बँड’ !

राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांचे घोडे अखेर गंगेत न्हाले आहे. अजित पवार यांच्या रुसव्या-फुगव्यानंतर पालकमंत्र्यांची सुधारीत यादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केली आहे. या सुधारित यादीनुसार चंद्रकांत पाटील यांची पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावरून उचलबांगडी करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पालकमंत्रिपद देण्यात आले आहे. त्याशिवाय कोल्हापूरचं पालकमंत्रिपद  हसन मुश्रीफ आणि बीड जिल्ह्याचं पालकमंत्रिपद धनंजय मुंडे यांच्याकडे  देण्यात आलेले आहे. त्याचवेळी नाशिक, सातारा आणि रायगडच्या पालकमंत्रिपदाविषयीचा तिढा अद्याप कायम आहे. दरम्यान, पालकमंत्री पदासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ‘बँड’ वाजवल्याची चर्चा मंत्रालयात जोरदार सुरू आहे. आधी अजित पवार यांना अर्थ खाते मिळू नये, त्यांच्या राष्ट्रवादी पक्षाला पुणे, रायगड आदी जिल्हयाचे पालकमंत्री पद मिळू नये यासाठी एकनाथ शिंदे गट आग्रही होता. पण दिल्लीतून सूत्रे फिरली आणि अजित पवार यांनाच अर्थमंत्री पद मिळाले होते. यासाठी अजित पवार यांनी प्रेशर टॅक्टिक्स वापरली होती. तीच स्टाइल त्यांनी पुन्हा वापरुन पालकमंत्री पदे मिळवली आहेत.

राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा समावेश झाल्यानंतर सरकारमध्ये पालकमंत्रिपदावरून काहीसा वाद उद्भवला होता. त्यामुळे पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली नव्हती. दरम्यानच्या काळात मंगळवारी अजित पवार यांच्या कानावर ही माहिती जाताच त्यांनी राज्य मंत्री मंडळाच्या बैठकीला दांडी मारली. शिवाय ते घरात असूनही कोणाला भेटले नाहीत. ते आजारी असल्याचे कारण पुढे करण्यात आले होते. पण मंत्रिमंडळ  विस्तार आणि पालकमंत्री नियुक्त्या होत नसल्याने ते नाराज असल्याची चर्चा होती.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंगळवारी सायंकाळी दिल्लीस गेले. याच दिल्ली भेटीत पालकमंत्रिपदाविषयीचा तोडगा निघाला. आणि अजित पवार यांच्या मनासारखे झाले. त्यामुळे अजित पवार हे शिंदे आणि फडणवीस यांना भारी पडल्याची चर्चा आहे.

निधी वाटपातही दादागिरी

पुण्याचे तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली १९ मे रोजी समितीची पहिली बैठक झाली. त्यात एक हजार पाच कोटी रुपयांच्या विकास आराखड्याला मान्यता देण्यात आली. त्यानुसार कामांना सुरुवात होईल, अशी जिल्हा परिषदेसह प्रशासनाला अपेक्षा होती. मात्र, तसे झाले नाही. या बैठकीत भाजप आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्या शिवसेनेच्या सदस्यांना निधी वाटपाचे सूत्र ठरले होते. त्यानंतर जुलैमध्ये अजित पवार  यांचा राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत सहभागी झाला आणि निधी वाटपाच्या सूत्रावरून तिढा सुरू झाला.

हे सुद्धा वाचा 

समीर भुजबळ यांनी नवाब मलिकांचे केले कौतुक !
यंदाच्या क्रिकेट वर्ल्डकपमध्ये पुन्हा दिसणार सचिन तेंडुलकर, आयसीसीची मोठी घोषणा…
अमेरिकेतील मेरिलँडमध्ये उभारला जातोय बाबासाहेबांचा ‘इतका’ उंच पुतळा, लवकरच होणार अनावरण…

सत्तेत सहभागी होण्यापूर्वी जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या प्रत्येक आमदाराला आठ ते बारा कोटी रुपयांचा निधी मिळत असल्याचे काही सदस्यांचे म्हणणे आहे. मात्र, भाजप आणि शिंदे गटाच्या सदस्यांना झुकते माप दिल्यास ‘राष्ट्रवादी’च्या सत्तेतील आमदारांना निधी किती द्यायचा याचा तिढा सुटत नसल्याने तयार याद्यांना चंद्रकांतदादांनी मान्यता दिली नसल्याचे बोलले जात होते. त्यामुळे जुलैपासून कोणत्याच कामांना प्रशासकीय मान्यता मिळालेली नाही.

अजितदादांचे सत्तेत ‘इनकमिंग’ झाल्यानंतर जिल्ह्यात कोणत्या ‘दादां’चे वर्चस्व असा प्रश्न निर्माण झाला होता. ‘उपमुख्यमंत्री म्हणून बैठका घेण्याचा अधिकार आहे’, असे सांगत पुणे जिल्ह्याच्या विविध प्रकल्पांचा अजित पवार सातत्याने आढावा घेत होते. दुसरीकडे, जिल्हा नियोजन समिती अर्थात ‘डीपीसी’मधून होणाऱ्या कोट्यवधी रुपयांच्या कामांना मान्यताच मिळाली नाही.

नवे पालकमंत्री 

पुणे- अजित पवार
अकोला- राधाकृष्ण विखे- पाटील
सोलापूर- चंद्रकांत दादा पाटील
अमरावती- चंद्रकांत दादा पाटील
भंडारा- विजयकुमार गावित
बुलढाणा- दिलीप वळसे-पाटील
कोल्हापूर- हसन मुश्रीफ
गोंदिया- धर्मरावबाबा आत्राम
बीड- धनंजय मुंडे
परभणी- संजय बनसोडे
नंदूरबार- अनिल भा. पाटील

वर्धा – सुधीर मुनगंटीवार

 

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी