28 C
Mumbai
Friday, April 26, 2024
Homeराजकीयअमित शाह मुंबईत येणार; गणेशोत्सवाच्या खांदयावरून पालिकेच्या निवडणुकीची पेरणी करणार

अमित शाह मुंबईत येणार; गणेशोत्सवाच्या खांदयावरून पालिकेच्या निवडणुकीची पेरणी करणार

अमित शाह मुंबईच्या सर्वात लोकप्रिय गणेशोत्सव मंडळापैकी एक लालबागच्या राजाचे दर्शन घेतील परंतु जर त्यांच्या कार्यक्रमात काही बदल झाला तर ते त्यांचा दौरा पुढे ढकलण्याची शक्यता आहे असे भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्रातील एका नेत्यानी सांगितले.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह ५ सप्टेंबरला गणेशोत्सवानिमित्त मुंबईचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यामध्ये ते महाराष्टाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतील. अमित शाह हे भारतीय जनता पक्षाचा देशातील एक मोठा चेहरा आहे. त्यांचा निवडणुकीची व्युहरचना आखण्यात हातखंडा आहे. त्यांची भेट ही आगामी काळात येणाऱ्या मुंबई महानगर पालिकेच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची मानली जात आहे. अमित शाह मुंबईच्या सर्वात लोकप्रिय गणेशोत्सव मंडळापैकी एक लालबागच्या राजाचे दर्शन घेतील परंतु जर त्यांच्या कार्यक्रमात काही बदल झाला तर ते त्यांचा दौरा पुढे ढकलण्याची शक्यता आहे असे भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्रातील एका नेत्यानी सांगितले.

मुंबई महानगर पालिका ही देशातील सर्वात आर्थिक संपन्नता असलेल्या पालिकांपैकी एक आहे. त्यामुळे ही निवडणूक सर्व पक्षांसाठी नेहमीच प्रतिष्ठेशी मानली जाते. शिवसेना पक्षाचा मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीमध्ये खूप वर्षांपासून वरचष्मा राहिला आहे. परंतु अलिकडेच महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात उलथापालथ झाली.

एकनाथ शिंदेनी शिवसेनेला खिंडार पाडत ४० आमदार स्वत:च्या बाजूने वळवून घेतले आणि भारतीय जनता पक्षाच्या मदतीने राज्यात सत्ता स्थापन केली. शिवसेना पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी या सत्ता बदलानंतर पक्षाची पुर्नबांधणी करायला सुरूवात केली आहे.

ganpati bappa contest

हे सुद्धा वाचा

IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या

RSS : आरएसएसने बॉम्बस्फोटांचे दिले प्रशिक्षण, स्वयंसेवकाच्या दाव्याने खळबळ

आमदार संतोष बांगर यांची पुन्हा सटकली, सरकारी संघटना भडकली, वादाचा चेंडू आता मुख्यमंत्र्याच्या कोर्टात

शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी राज्यभरात विविध जिल्हयात दौरे करून जनतेशी थेट संवाद साधला. सामान्य जनता सुद्धा शिवसेना नेत्यांच्या भावनिक आवाहनाला साद घालत असल्यामुळे पक्षाला जनतेच्या सहानूभूतीचा फायदा मिळण्याची दाट शक्यता आहे.

या सर्व कारणांमुळे भारतीय जनता पक्षाच्या बडया नेत्यांनी मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीमध्ये आपले संपूर्ण लक्ष केंद्रित करण्याचे ठरवले आहे. अमित शाह मुंबईत आल्यावर शिंदे, फडणवीस व पक्षाच्या इतर नेत्यांशी चर्चा करून शिवसेनेला कशाप्रकारे रोखायचे याची व्युहरचना आखतील अशी शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षाचा विजय होईल हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी