33 C
Mumbai
Friday, September 2, 2022
घरव्हिडीओVIDEO : मुंबई अग्निशमन दलातर्फे गणेशोत्सव मंडळाना अग्नि सुरक्षेचे धडे

VIDEO : मुंबई अग्निशमन दलातर्फे गणेशोत्सव मंडळाना अग्नि सुरक्षेचे धडे

गणरायाचे आगमन झाले असून मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे गणपती पाहण्यासाठी भाव‍िकांची गर्दी जमू लागली आहे. अशा वेळी काही अनुचित प्रकार घडला म्हणजे आग किंवा शॉर्टसर्कीट सारखी घटना घडून आग लागली तर काय करावे या बद्ल मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या स्वयंसेवकांना अग्नि सुरक्षेबद्ल माहिती देण्याचे काम मुंबई अग्निशमन दल करत आहे. लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी येथे दररोज लाखोंच्या संख्येने भाविक येत असतात. या भाविकांना योग्य मार्गदर्शन करत रांगेत सोडण्याचे काम येथील स्वयंसेवक करत असतात. या स्वयंसेवकांना अग्नि सुरक्षेबद्ल माहिती मुंबई अग्निशमन दलाने प्रात्यक्षिकाद्वारे दिली.

मुंबई अग्निशमन दलाने प्रमुख अग्निशमन अधिकारी हेमंत परब यांनी मुंबईतील गणेशोत्सव मंडळांना आवाहान करत गणेश उत्सव मंडळाने आणि येथील स्वयंकसेवकांनी आगी संदर्भात अग्नि सुरक्षा संदर्भात विशेष काळजी घ्यावी असे सांगितले आहे. मुंबईतीली गणेशोत्सव मंडळामध्ये जाऊन येथील कार्यकर्त्यांची प्रत्यक्ष गाठी भेटी घेत अग्नि सुरक्षेचे धडे देण्याचे काम अग्निशमन दलाच्या अधिकारी आणि जवानांकडून दिले जात आहे. हे प्रशिक्षण मोफत दिले जात आहे.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी