32 C
Mumbai
Friday, May 10, 2024
Homeराजकीयआम्हीही जावेद अख्तर आणि सलीम खान यांना बोलवू पण, कार्यक्रम दिवाळीचा नसेल

आम्हीही जावेद अख्तर आणि सलीम खान यांना बोलवू पण, कार्यक्रम दिवाळीचा नसेल

राज्यात सत्ता संघर्षावरून राजकारण कोणत्याही थराला जाऊन पोहचू लागले आहे. आगामी निवडणुका लक्षात घेता राजकीय पक्ष एकमेकांवर हमरातुमरीवर येऊ लागले आहेत. याआधी दसरा मेळाव्यावरून खरा दसरा मेळावा कोणाचा? यावरून वाद सुरू होता. दिवाळी सण सुरू आहे तर सर्वीकडे आनंदाचे वातावरण आहे. राजकीय पक्ष दिवाळी सणानिमीत्ताने दिपोत्सवाचे (Diwali Celebration) कार्यक्रम घेत आहेत. (९ नोव्हेंबर) या दिवशी मुंबईत शिवाजी पार्कवर (Shivajipark) मनसेने (MNS) दिपोत्सव साजरा केला आहे. या दिपोत्सवासाठी प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर आणि सलीम खान (Javed Akhtar And Salim Khan) यांच्या हस्ते दिपोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले आहे. यावरून वेगळाच वाद निर्माण झाला आहे. (Latest News)

राजकीय पक्षांना एकमेकांविरोधात टीका टीप्पण्या करण्यासाठी केवळ कारण हवे आहे. सलीम खान आणि जावेद अख्तरांच्या उपस्थितीत मनसेने दिपोत्सवाचे उद्घाटन केले होते. यावर आता भाजपचे नेते आशिष शेलारांनी (Ashish Shelar) मनसेवर निशाणा साधला आहे. आम्हीही एखाद्या कार्य़क्रमात नक्कीच जावेद अख्तर आणि सलीम खान यांना बोलावणार आहोत. मात्र तो कार्यक्रम हा दिवाळीचा नसणार आहे, अशी स्पष्टोक्ती शेलारांनी दिली आहे. यामुळे आता सुरू असलेल्या राजकारणावर आणि शेलारांच्या वक्तव्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे काय म्हणतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

काय म्हणाले शेलार?

मुंबईत (९ नोव्हेंबर) दिवशी मनसे दिवाळी सणानिमित्ताने दिपोत्सव कार्यक्रम सुरू झाला. मनसेच्या कार्यक्रमात जावेद अख्तर आणि सलीम खान उपस्थित होते. यावरून आता आशिष शेलारांनी राज ठाकरेंवर टीका करत आरोप केला आहे की, दिपोत्सव हा कोणत्याही पक्षाने करावा, त्याचे स्वागत असेल. कोणत्याही कलाकाराला त्याची जात, धर्म नसते. पण जावेद अख्तर आणि सलीम खान यांच्या हस्ते उद्घाटन झाले. आम्ही गायिका उत्तरा केळकरांच्या उपस्थितीत उद्घाटन करत आहे. आता मराठीचा प्रश्न कोणी कोणाला विचारायचा असा सवाल शेलारांनी उपस्थित केला आहे.

हे ही वाचा

मनसेला यश, अमित ठाकरे ‘हे’ गाव घेणार दत्तक

उद्धव ठाकरे आज मुंब्र्यात! पण अज्ञातांनी फाडले स्वागताचे बॅनर्स

श्रीलंका संघाची ‘ना घर का ना घाट का’ स्थिती

जावेद अख्तर आणि सलीम खान यांना बोलवून अनेकांनी टीमकी वाजवला खरी मात्र आमचे मराठी कलाकार छोटे नाहीत. ही भाजपची संकल्पना आहे. आम्हीही जावेद अख्तर आणि सलीम खान यांना बोलवू पण, कार्यक्रम दीवाळीचा नसेल. याचसह त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली.

उद्धव ठाकरेंना टार्गेट

राज ठाकरेंसोबत आता शिवसेना उबाठा गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना टार्गेट केले आहे. ते म्हणाले की, तिसरे अजून घरातच आहेत. स्वत:च्या स्वार्थासाठी हिंदूचे पुरस्कर्ते म्हणून कॉंग्रेसचा हात धरला आहे. असा आरोप करत उद्धव ठाकरेंवर शेलारांनी टीकेचे बाण सोडले आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी