28 C
Mumbai
Saturday, December 9, 2023
घरक्राईमसरकारी नोकरीसाठी प्रयत्नशील आहात; सावधान...आधी ही बातमी वाचा !

सरकारी नोकरीसाठी प्रयत्नशील आहात; सावधान…आधी ही बातमी वाचा !

तुम्हाला सरकारी नोकरी आणि तिही केंद्र सरकारमध्ये हवी असेल किंवा त्यासाठी तुम्ही प्रयत्नशील असाल, कुठल्या माध्यमातून पैसे देऊन नोकरी मिळवण्याचे प्रयत्न करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. कारण सीबीआयनं काल (१० नोव्हेंबर) एक आंतरराज्य टोळी पकडलीय ज्यांनी सरकारी नोकऱ्यांचं आमिष दाखवून शेकडो युवकांना कोट्यवधी रुपयांचा गंडवलं आहे. यात मुंबईचाही अपवाद नाही कारण या टोळीनं मुंबई खोटे प्रशिक्षण केंद्र सुरू करून अनेकांना खोटे नियुक्तीपत्र दिले आहेत. या प्रकरणी सीबीआयने आतापर्यंत तिघांना अटक केली असून एकूण सहा जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. हे तिघेही तीन राज्यांतील असून या रॅकेटमध्ये काही सरकारी अधिकारी असण्याची शक्यताही सांगितली जात आहे.

ज्या युवकांना केंद्र सरकारची नोकरी हवी ते परीक्षेची तयारी करतात. अशा तरुणांना हेरण्याचं काम एक आंतरराज्य टोळी दोन वर्षांपासून करत होती. या टोळीचे पाटणा, बंगळुरू, मंगळुरू, मुंबई आणि झारखंडमधील धनबाद येथे एकूण नऊ कार्यालये आहेत. या टोळीचं तरुणांना लुटण्याचं काम अतिशय नियोजनबद्ध पद्धतीनं सुरू होतं. म्हणजे सरकारी नोकरी देणार म्हणजे देणारच असं सांगत त्यासाठी प्रोसेसिंग फी, सेक्युरिटी डिपॉझिट म्हणून ही टोळी युवकांकडून १० ते २० लाख रुपये घ्यायची. एवढेच नाही नोकरी देणार याची खात्री पटावी यासाठी ही टोळी त्या युवकांसाठी प्रशिक्षणदेखील सुरू करायचे. आणि प्रशिक्षणानंतर युवकांना नियुक्ती पत्र दिले जायचे. यात एफसीआय, जीएसटी, रेल्वे आदींचा समावेश होता.  त्यामुळे युवकांचा विश्वास बसायचा.

याच्या काही तक्रारी गेल्यानंतर सीबीआयनं तपास सुरू केला. त्यात आंतरराज्य टोळी असल्याचं स्पष्ट झालं. सीबीआयने काल बंगळुरूमधून अजय कुमार, झारखंडच्या धनबादमधून अमन कुमार ऊर्फ रुपेश तसेच बिहारच्या पाटण्यातून अभिषेक सिंह ऊर्फ विशाल यांना अटक केली आहे. शिवाय मुंबईतील साकीनाका तसेच पाटण्यात दोन खोटी प्रशिक्षण केंद्रेदेखील सीबीआयनं उघड केली आहेत. मुंबईच्या साकीनाकामधील प्रशिक्षण केंद्रातील बहुतांश युवक कर्नाटक तर काही महाराष्ट्रातील आहेत. शिवाय नागपूर, धनबाद आणि बंगळुरूमध्येही यांची बनावट प्रशिक्षण केंद्रे असल्याची माहिती मिळत आहे.

हे ही वाचा

दिवाळी बोनस आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर..! आव्हाडांचे ट्विट चर्चेत

उद्धव ठाकरे आज मुंब्र्यात! पण अज्ञातांनी फाडले स्वागताचे बॅनर्स

आम्हीही जावेद अख्तर आणि सलीम खान यांना बोलवू पण, कार्यक्रम दिवाळीचा नसेल

दरम्यान, या अटक केलेल्या तिघांकडून बनावट कॉल लेटर, बनावट नियुक्ती पत्रे आणि प्रशिक्षणा संदर्भातील अनेक खोटे कागदपत्रे सीबीआयने हस्तगत केली आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी