30 C
Mumbai
Monday, November 13, 2023
घरराजकीयमनसेला यश, अमित ठाकरे 'हे' गाव घेणार दत्तक

मनसेला यश, अमित ठाकरे ‘हे’ गाव घेणार दत्तक

राज्यात ग्रामपंचायत (Grampanchayat) निवडणुकांचे निकाल येऊन काही दिवस झाले आहेत. तर ग्रामपंचायतीत अधिकाधिक जागा महायुतीने जिंकल्या असल्याच्या अधिक चर्चा आहेत. तर महाविकास आघाडीला म्हणावी अशी कामगिरी करता आली नाही. याउलट नागपूरमध्ये बीआरएसने अधिक जागा जिंकून सर्वांना धक्का दिला आहे. अशातच आता मनसेचे रेल्वे इंजिन रुळावरून धावताना दिसत आहे. मनसेने देखील राज्यातील काही ग्रामपंचायतीवर आपले नाव कोरले आहे. पुण्यातील (Pune) वेल्हे तालुक्यातील पानशेत कुरण ग्रामपंचायतीमध्ये (Panshet Kuran) मनसेला यश मिळाले. यामुळे आता अमित ठाकरे हे गाव दत्तक घेणार असल्याची माहिती समोर येत आहे.

पुणे जिल्ह्याला विकसित जिल्हा म्हणून ओळखले जाते. मात्र पुणे जिल्ह्यातील काही तालुक्यांमधील काही गावांमध्ये अजूनही काही सोई-सुविधा नाहीत. दरम्यान, पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यातील पानशेत कुरण या गावात मनसेने ग्रामपंचायत निवडणुकीत आपली सत्ता स्थापन केली आहे. यामुळे आता या गावाला अमित ठाकरेंनी दत्तक घेतले असून या गावाचा विकास होणार असल्याच्या चर्चा पुणे जिल्ह्यात आहेत.

हे ही वाचा

उद्धव ठाकरे आज मुंब्र्यात! पण अज्ञातांनी फाडले स्वागताचे बॅनर्स

श्रीलंका संघाची ‘ना घर का ना घाट का’ स्थिती

अनुसूचित जातीचे तुकडे पाडण्यासाठी नरेंद्र मोदींची जंगी सभा !

पानशेत कुरण या ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित सरपंच प्रगती घोरपडे आणि इतर सदस्यांची अमित ठाकरेंनी भेट घेतली. पुणे जिल्ह्यात मनसेची सत्ता आलेली पहिलीच ग्रामपंचायत आहे. पानशेत हा पर्यटनाच्या दृष्टीने खूप महत्वाचा भाग आहे. येत्या काळात दिवसेंदिवस या ठिकाणी पर्यटन संख्या वाढली जाईल. या ग्रामपंचायतीकडे स्वतः लक्ष देऊ असे अमित ठाकरे बोलले आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी